भारतीय सीईओ देशाच्या मदतीला, मास्टर कार्डने भारताला केली ७५ कोटी रुपयांची मदत


भारतीय मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संकटाच्या काळात भारताच्या मदतीला धावून आल आला आहे. अमेरिकेची बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी मास्टरकार्डने भारताला कोरोनाच्या संकटात मदत म्हणून एक कोटी डॉलरचे (७५ कोटी रुपये) अर्थसाहाय्य जाहीर केले आहे.Indian CEO helps the country, MasterCard donated Rs 75 crore to India


विशेष प्रतिनिधी

न्यूयॉर्क : भारतीय मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) संकटाच्या काळात भारताच्या मदतीला धावून आल आला आहे. अमेरिकेची बहुराष्ट्रीय वित्तीय सेवा कंपनी मास्टरकार्डने भारताला कोरोनाच्या संकटात मदत म्हणून एक कोटी डॉलरचे (७५ कोटी रुपये) अर्थसाहाय्य जाहीर केले आहे.

रुग्णालयातील सुविधा, अतिरिक्त प्राणवायू पुरवठा आणि देशभरातील आरोग्य कर्मचाºयांना सुविधा यासाठी प्रामुख्याने ही मदत देण्यात आली आहे. मास्टरकार्ड इम्पॅक्ट फंडाच्या माध्यमातून हा निधी उभारण्यात येणार आहे.



मास्टरकार्डचे कार्यकारी अध्यक्ष अजय बंगा म्हणाले की, आरोग्याबाबत भारताची स्थिती सध्या मोठी आव्हानात्मक आहे. तेथील प्रत्येकजण हा सध्या संकटातून जात आहे.

भारतातील जनता, कर्मचारी यांचे अर्थव्यवस्थेचे समर्थक म्हणून आम्ही सदैव पाठीराखे राहिले आहोत. मात्र आता वेळ आली आहे ती खांद्याला खांदा लावून कार्य करण्याची. आणि या संकटातून संपूर्ण भारताला मदत करण्यासाठी आपण जे काही करू शकतो, ते निश्चितच करू.

बंगा हे मूळ भारतीय वंशाचे आहेत. त्वरित आरोग्य सेवा पुरवू शकतील अशा छोटेखानी रुग्णालयांच्या स्थापनेद्वारे एकूण २,००० खाटांची उपलब्धतता करून दिली जाणार आहे. सरकार आणि स्थानिक भागीदारांच्या मदतीने अशी रुग्णालये त्वरित तयार केली जातील.

Indian CEO helps the country, MasterCard donated Rs 75 crore to India

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात