वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतात रशियाची स्पुटनिक व्ही (Sputnik V) लस दिली जाणार आहे. या लसीची पहिली तुकडी भारतात 1 मे रोजी मिळणार आहे. रशिया डायरेक्ट इनवेस्टमेंट फंडचे (RDIF) प्रमुख किरील दिमित्रिक यांनी ही माहिती दिली. India to receive first batch of Russia’s covid 19 Vaccine Sputnik V on May 1
किरील दिमित्रिक म्हणाले की, पहिला डोस 1 मे रोजी भारतात येईल. या लसींमुळे भारतातील कोरोनावर मात करण्यास मदत मिळेल. दरम्यान, आरडीआयएफने 5 मोठ्या भारतीय औषध उत्पादक कंपन्यांसोबत वर्षाला 85 कोटींपेक्षा जास्त लसीचे डोस तयार करण्याचा करार केला आहे. त्यामुळे लसीचे उत्पादन भारतात सुरू होणार आहे. दरमहा 5 कोटी डोसचे उत्पादन करण्यात येईल.
स्पुटनिक व्ही कोरोनावरील तिसरी लस असणार आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड या लसींना परवानगी दिली. दरम्यान, सध्या या लसींचे कोट्यवधी लोकांना डोस दिले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App