विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीमध्ये यावर्षी भारत अनेक आंतरराष्ट्रीय मुद्दय़ांना उचलून धरणार आहे अशी माहिती खुद्द भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. तिरुमूर्ती यांनी पीटीआय सोबत बोलताना दिली आहे. दहशतवाद, हवामान सतत होणारे बदल, लसींमध्ये न्याय्य आणि परवडणारी उपलब्धता, इंडो-पॅसिफिक आणि संयुक्त राष्ट्र सुधारणा यासारख्या जागतिक समस्यांविरुद्ध भारत आपला आवाज संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत उठवणार आहे.
India to raise issues like terrorism, vaccines, climate change at united nations general assembly said ambassador tirumurthy
कोविड -१ pandemic महामारी आणि अफगाणिस्तानातील घडामोडीं या विषयांवर जास्तीत जास्त चर्चा होऊ शकते कारण हे मुद्दे सध्या जास्त महत्वाचे वाटत आहेत. असेही टी.एस. तिरुमूर्ती यांनी पीटीआय सोबत बोलताना स्पष्ट केले आहे. वरील दोन मुद्द्यासोबत आर्थिक मंदी, दहशतवाद आणि संबंधित समस्या, हवामान बदल, मध्य पूर्व आणि आफ्रिकेमध्ये चालू असलेले संघर्ष हे सर्व मुद्दे मांडण्याचा भारताचा विचार आहे असेही त्यांनी सांगितले आहे.
LIVE NOW PLAYING PM Shri Narendra Modi’s address to the United Nations General Assembly Dated 26/9/20, 6:30 PM
महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करणारा भारत देश साहाय्यक दृष्टीने काम करू शकतो. त्यामुळे जगातील समस्या नष्ट करण्यासाठी भारताने चर्चेत भाग घेणे गरजेचे आहे असेही तिरुमुर्ती यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी मंगळवारी जागतिक नेत्यांना संबोधित करतील तर भारताचे पंतप्रधान मंत्री नरेंद्र मोदी पंचवीस सप्टेंबर रोजी वरील मुद्दे बैठकीमध्ये मांडतील. ह्या बैठकीसाठी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि वरिष्ठ अधिकारी सोमवारी न्यूयॉर्कला जातील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App