विशेष प्रतिनिधी
बिश्केक – किरगिझस्तानमधील विकास प्रकल्पांना आर्थिक पाठबळ म्हणून या देशाला २० कोटी डॉलरची कर्जरुपाने मदत करण्याचा निर्णय भारताने घेतला आहे. परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी किरगीझ नेत्यांबरोबर चर्चा केल्यानंतर या मदतीबाबत घोषणा केली.India gave financial support to kirgishistan
या करारानुसार, नागरिकांना सुविधा निर्माण करुन देणाऱ्या विविध क्षेत्रांमधील विकास प्रकल्पांना भारत निधी पुरविणार आहे. याबाबत सामंजस्य करारही झाला आहे. बिश्केाकमध्ये उभारलेल्या मानस-महात्मा गांधी वाचनालयासाठी जयशंकर यांनी भारतीय अभिजात साहित्य मानली जाणारी पुस्तके भेट दिली
ते म्हणाले, भारत आणि किरगिझस्तानदरम्यान ऐतिहासिक काळापासून चांगले संबंध आहेत. दोन्ही देशांमध्ये सातत्याने उच्च पातळीवरून चर्चा होत असल्याने हे संबंध अधिक दृढ झाले आहेत. या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत माझी सविस्तर चर्चा होऊन सहकार्य कायम ठेवण्यावर एकमत झाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App