अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ ब्रिटनमध्ये मात्र रुग्णांची घसरण


विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन – जगभरात कोरोनाचा प्रसार सुरू असून चोवीस तासात अमेरिकेत ३९ हजाराहून अधिक रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे अमेरिकेच्या साथरोग नियंत्रण आणि प्रतिबंध खात्याने नागरिकांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार स्पेन, पोर्तुगाल, सायप्रस आणि किरगिझस्तान येथे फिरण्यासाठी जाऊ नये, असे अमेरिकेने आवाहन केले आहे.Corona patients increasing in USA but decreasing in Briton

कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जगभरात सुरू असून हर्ड इम्युनिटी वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. गेल्या महिन्यात ब्रिटनमध्ये रूग्णवाढीचा उच्चांक नोंदला जात असताना त्यात आता घसरण होत आहे.



ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात २४,९५० नव्याने रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या तीन आठवड्यात एका दिवसात आढळून येणारी नीचांकी आकडेवारी आहे. २० जुलैला ब्रिटनमध्ये ४५ हजार ८८२ रूग्ण सापडले होते. हा आकडा फेब्रुवारीनंतर सर्वाधिक होता.

अमेरिकेने अजूनही ब्रिटनवरची प्रवासबंदी कायमच ठेवली आहे. यादरम्यान पाकिस्तानात काल ३७५२ रूग्ण आढळून आले. २१ मे नंतरचा हा सर्वात मोठा आकडा आहे. त्याचदिवशी ४००७ रुग्ण सापडले होते.

पाकिस्तानातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १० लाखांवर पोचली आहे. तसेच मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या २३०४८ झाली आहे. देशात कोरोनाच्या चौथ्या लाटेदरम्यान पॉझिटिव्हीटी रेट हा ७.५१ टक्क्यांपर्यंत पोचला आहे.

Corona patients increasing in USA but decreasing in Briton

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात