Trudeau government’s : कॅनडातील हिंसाचाराला भारत जबाबदार, ट्रूडो सरकारच्या बेछूट आरोपानंतर भारत संतप्त; कॅनडाचे 6 राजनैतिक अधिकारी हाकलले!!

Trudeau government's

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Trudeau government कॅनडातील हिंसाचाराला भारत जबाबदार असल्याचा बेछूट आरोप करणाऱ्या कॅनडाला भारतीय सरकारने राजनैतिक पातळीवरचा जोरदार तडाखा दिला. कॅनडाचे 6 राजनैतिक अधिकारी भारताने हाकलून दिले, त्याचबरोबर कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांच्या सुरक्षिततेविषयी काळजी व्यक्त करून त्यांना भारताने मायदेशी परत बोलविले आहे.Trudeau government

कॅनडातील जस्टिन ट्रूडो सरकारने खलिस्तानी दहशतवादाला आश्रय दिला. खलिस्ताने दहशतवाद्यांना स्वातंत्र्ययोद्धे संबोधून भारताची एकात्मता अखंडता आणि सार्वभौमत्वाविरुद्ध आंतरराष्ट्रीय पातळीवर भूमिका घेऊन आंतरराष्ट्रीय करार आणि संकेतांचे उल्लंघन केले. याचा तीव्र निषेध म्हणून भारताने कॅनडातील भारतीय उच्चायुक्तांना परत बोलाविले आणि त्याचवेळी कॅनडाच्या 6 राजनैतिक अधिकाऱ्यांना ताबडतोब भारत सोडायला सांगितले.



भारत आणि कॅनडामध्ये जवळपास वर्षभरापासून तणाव आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येमागे भारताचा हात असल्याचा आरोप कॅनडाने वर्षभरापूर्वी केला होता. मात्र, भारताने कॅनडाचे आरोप फेटाळून लावले होते. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. यातच कॅनडाने पुन्हा एकदा या प्रकरणाचा उल्लेख करत भारतीय उच्चायुक्त संजय कुमार वर्मा आणि इतरांचा या प्रकरणाच्या तपासात सहभाग असल्याचा बेछूट आरोप केला, या आरोपानंतर भारताने एक पत्रक जारी करत कॅनडाने केलेले आरोप पूर्णपणे फेटाळून लावले, तसेच कॅनडा मध्ये 2025 मध्ये निवडणुका असल्याने केवळ स्वतःचा लिबरल अजेंडा चालवण्यासाठी ट्रूडो सरकार व्होट बँक पॉलिटिक्स करत आहे, असा गंभीर आरोप परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी केला.

यानंतर आता भारताने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह ६ राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. 19 ऑक्टोबर 2024 पर्यंत भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, कॅनडातील भारताचे उच्चायुक्त संजय वर्मा यांच्यावर कॅनडाने केलेल्या आरोपानंतर भारताने याची गंभीर दखल घेत उच्चायुक्त संजय वर्मा यांना परत मायदेशी बोलावले आहे. तसेच यावेळी भारताने कॅनडाच्या सरकारवर विश्वास नसल्याचंही म्हटलं. परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटलं की, सध्याच्या कॅनडा सरकारच्या सुरक्षेच्या खात्रीसंदर्भातील वचनबद्धतेवर आम्हाला विश्वास नाही. त्यामुळे भारत सरकारने उच्चायुक्त आणि इतर अधिकाऱ्यांना परत बोलावण्याचा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले.

कॅनडातील लिबरव ट्रुडो सरकार कोणतेही पुरावे सादर करत नाही. तसेच कोणतेही पुरावे सादर न करता सातत्याने बिनबुडाचे आरोप करत आहे. त्यामुळे हा ट्रूडो सरकारचा व्होट बँक राजकीय अजेंडा असल्याचं म्हटलं आहे. यानंतर आता भारत सरकारने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह 6 राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. 19 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री 11.59 पर्यंत किंवा त्यापूर्वी भारत सोडण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात भारताने पत्रक जारी केले आहे.

भारताने कॅनडाच्या कोणत्या अधिकाऱ्यांना देश सोडण्यास सांगितलं?

भारत सरकारने कॅनडाच्या उच्चायुक्तांसह 6 राजनैतिक अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश जारी केले आहेत. यामध्ये कार्यवाहक उच्चायुक्त स्टीवर्ट रॉस व्हीलर, उपउच्चायुक्त पॅट्रिक हेबर्ट, प्रथम सचिव मेरी कॅथरीन जोली, प्रथम सचिव लॅन रॉस डेव्हिड ट्राइट्स, प्रथम सचिव ॲडम जेम्स चुइप्का, प्रथम सचिव पॉला ओरजुएला यांना १९ ऑक्टोबर २०२४ रोजी पर्यंत भारत सोडण्याच आदेश दिले आहेत.

India blamed for violence in Canada, India angered after Trudeau government’s reckless accusations; 6 Canadian diplomats kicked out!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात