वृत्तसंस्था
लंडन : भारतातून परदेशात पळून गेलेला उद्योगपती नीरव मोदीच्या बहिणीने लंडन येथील खात्यातून तब्बल १७.२५ कोटी रुपये भारत सरकारच्या अंमलबजावणी संचालनालयाच्या बँक खात्यात भरले आहेत. दरम्यान, या प्रकरणी पूर्वी मोदीला खरी माहिती दिल्याबद्दल माफी दिली जाईल, असे एका आदेशात न्यायालयाने नमूद केले होते. In the bank account of the Directorate of Enforcement Nirav Modi’s sister pays Rs 17.25 crore
नीरव मोदी याची बहीण पूर्वी मोदी यांनी सांगितले की, २६ जून २०२१ रोजी मला अंमलबजावणी संचलनालयाकडून असे समजले की, माझ्या नावाने लंडन येथे एक खाते आहे. जे नीरव याच्या सांगण्यावरून उघडले होते. त्या रक्कमेचा आणि माझा कोणताही संबंध नाही.
खरी आणि वास्तुस्थितीला धरून योग्य माहिती दिली तर तिला माफ करण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले होते. त्या नंतर पूर्वीं मोदीने १७.२५ कोटी रुपये अंमलबजावणी संचालनालयाच्या बँक खात्यात पाठविले आहेत.
यापूर्वी पूर्वी मोदी उर्फ पूर्वी मेहता आणि पती मैनक मेहता यांच्याविरोधात दोन फिर्यादी विशेष कोर्टात दाखल केल्या होत्या. त्यावेळी पूर्वी मोदी यांनी खरी माहिती दिली तर तिला माफ केले जाईल, असे सांगण्यात आले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App