कॅनडामध्ये स्पीकर अँथनी रोटा यांचा राजीनामा; माजी नाझी सैनिकाचा संसदेत केला सन्मान, पंतप्रधान ट्रुडो यांना मागावी लागली माफी

वृत्तसंस्था

ओटावा : कॅनडातील हाऊस ऑफ कॉमन्सचे अध्यक्ष अँथनी रॉट यांनी मंगळवारी राजीनामा दिला आहे. 24 सप्टेंबर रोजी त्यांनी संसदेत एका माजी नाझी सैनिकाला युद्ध नायक म्हणून संबोधित केले होते.In Canada, Speaker Anthony Rota resigns; Former Nazi soldier honored in Parliament, Prime Minister Trudeau forced to apologize

मात्र, नंतर अध्यक्षांनी आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. ते म्हणाले की, तो वृद्ध नाझी सैनिक आहे हे त्यांना माहीत नव्हते. मला माझ्या निर्णयाचा पश्चात्ताप होत आहे. कॅनडामध्ये राहणाऱ्या ज्यू समुदायातील लोकांची मी माफी मागतो. या घटनेपासून कॅनडाचा विरोधी पक्ष अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी करत होता. वास्तविक, दुसऱ्या महायुद्धात नाझींनी (अ‍ॅडॉल्फ हिटलरच्या सैन्याने) 11 लाखांहून अधिक लोकांची हत्या केली होती. त्यापैकी बहुतांश ज्यू होते.



कॅनडाच्या संसदेत नाझी सैनिक सन्मानित, ट्रूडो होते हजर

24 सप्टेंबर रोजी कॅनडाच्या संसदेत खासदारांनी नाझी सैनिक हुंका यांचा सन्मान केला. सर्वांनी त्यांना दोनदा स्टँडिंग ओव्हेशन दिले. या वेळी कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्याशिवाय युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्कीदेखील उपस्थित होते. ते स्वत: ज्यू आहेत. युद्ध सुरू झाल्यानंतर त्यांनी प्रथमच कॅनडाला भेट दिली.

नंतर संसदेच्या अध्यक्षांनी आपल्या चुकीबद्दल माफी मागितली. ते म्हणाले की, सैनिक हुंका दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या बाजूने लढले होते हे मला माहीत नव्हते. मात्र, याप्रकरणी अध्यक्षांची माफी पुरेशी नसल्याचे विरोधी पक्षाने म्हटले आहे. त्यापेक्षा त्यांनी राजीनामा द्यावा.

खरेतर, कॅनडाच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, नाझी सैनिकाला संसदेत कोणाच्या विनंतीवरून बोलावण्यात आले होते याबद्दल त्यांना काहीच माहिती नाही. हुंका यांना स्पीकर अँथनी रोटा यांनी बोलावल्याचे नंतर तपासात उघड झाले.

ट्रूडो म्हणाले – संपूर्ण कॅनडासाठी ही लाजीरवाणी बाब

या संपूर्ण प्रकरणावर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी माफीही मागितली आहे. ही केवळ संसदेसाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले. घटना खूपच निराशाजनक आहे. ट्रूडो म्हणाले- स्पीकरने आपली चूक मान्य केली आहे आणि माफीही मागितली आहे.

युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यापासून रशिया दावा करत आहे की ते नाझींविरुद्ध लढत आहेत. कॅनडाच्या घटनेचा फायदा आता रशिया घेणार असल्याचे ट्रूडो यांनी म्हटले आहे. आम्हाला रशियन प्रचार थांबवण्याची गरज आहे.

In Canada, Speaker Anthony Rota resigns; Former Nazi soldier honored in Parliament, Prime Minister Trudeau forced to apologize

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात