इम्रान खान अखेर क्लीन बोल्ड, अविश्वास प्रस्तावाच्या मतदानाआधीच सोडले राजकीय मैदान


विशेष प्रतिनिधी

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या पंतप्रधान पदा वरून इम्रान खान अखेर क्लीन बोल्ड झाले आहेत. माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे बंधू व विरोधी पक्षनेते शाहबाज शरीफ यांची नवे पंतप्रधान म्हणून निवड होऊ शकते. यासाठी रविवारी दुपारी २ वाजता संसदेची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे. अविश्वास प्रस्तावाच्या बाजूने १७४ मते पडली.Imran Khan finally clean bold, leaves the political arena before no-confidence motion vote

मध्यरात्रीनंतर अविश्वास प्रस्तावावर मतदान सुरू होताच इम्रान खान व त्यांच्या पक्षाचे खासदार सभागृहाबाहेर निघून गेले. ते मध्यरात्रीनंतर पंतप्रधानांचे निवासस्थानही सोडून बनी गाला येथे रवाना झाले. इम्रान खान यांनी अविश्वास प्रस्तावावरील मतदान टाळण्याचा कितीही प्रयत्न केला तरी मध्यरात्रीनंतर मतदान घ्यावे लागले व त्यात ते पराभूत झाले.



इम्रान खान यांना देश न सोडण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. सभागृहात कामकाज सुरू असताना नॅशनल असेम्ब्लीबाहेर पीटीआय कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.नॅशनल असेम्ब्ली अध्यक्ष, उपाध्यक्षांचे राजीनामे
इम्रान खान यांच्यावर दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावावर मतदान घेण्यासाठी संसदेचे कामकाज दिवसभराच्या अनेक तहकुबीनंतर शनिवारी मध्यरात्री पुन्हा सुरू झाले.

तेव्हा अध्यक्ष असद कैसर व उपाध्यक्ष कासिम सुरी यांनी पदांचे राजीनामे दिले. पीएमएल-एनचे अयाज सादिक यांना कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले व त्यांनी सभागृहाचे कामकाज घेतले. अविश्वास प्रस्तावाद्वारे सत्तेतून बाहेर पडावे लागणारे इम्रान खान हे पाकिस्तानचे पहिले पंतप्रधान ठरले आहेत.

देशातील अनिश्चित राजकीय स्थितीच्या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करण्यात आले. याच दरम्यान लष्करप्रमुख कामर बावजा आणि आयएसआयचे प्रमुख नदीम अंजुम यांनी इम्रान खान यांची भेट घेतली.

पाकिस्तानात सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही इम्रान खान यांच्या विरोधातील अविश्वास प्रस्तावावर मतदान दिवसभर टाळल्यामुळे न्यायालयाने याची गंभीर दखल घेत अवमाननाप्रकरणी कारवाई सुरू केली. शनिवारी मध्यरात्रीनंतर त्यावर सुनावणीचा निर्णय घेतला. यामुळे इम्रान खान यांच्या अडचणीत वाढ झाली होती.

दिवसभराच्या कामकाजात मतदान टाळण्याकडेच सत्ताधाऱ्यांचा कल होता. सकाळपासून यावर चर्चा झाली. चार वेळा सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले. अखेर रात्री ९.३० नंतर मतदान घेण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. त्यानंतरही ते होत नसल्याचे पाहून न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने तातडीची सुनावणी करण्याचा निर्णय घेतला.

Imran Khan finally clean bold, leaves the political arena before no-confidence motion vote

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात