विशेष प्रतिनिधी
ताश्कंद: कॉँग्रेसचे खासदार राहूल गांधी सातत्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करत असतात. तिच भाषा आता पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान बोलू लागले आहेत. भारतासोबत मैत्रीचे संबंध व्हावेत अशी आमचीही इच्छा आहे मात्र भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा त्यामध्ये अडथळा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.Imran Khan also speaks Rahul Gandhi’s language, said the Sangh’s ideology was a hindrance to friendly relations with India
ताश्कंदमध्ये मध्य आणि दक्षिण आशियाई देशांच्या दोन दिवसांची परिषद होत आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी इम्रान खान ताश्कंदमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी इम्रान खान म्हणाले, दोन्ही देशांनी एकत्र राहावे अशी आमची इच्छा आहे. भारताची आम्ही प्रतिक्षा करत आहोत. मात्र, दोन्ही देशांच्या संबंधामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा अडथळा आहे.
काही दिवसांपूर्वी परदेशी माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत भारतातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पायउतार झाल्यानंतर दोन्ही देशांतील संबंध सुरळीत होऊ शकतात असे इम्रान खान यांनी म्हटले होते. त्याआधी इम्रान खान यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणुकीत मोदी विजयी झाल्यास दोन्ही देशांमध्ये चर्चा होऊ शकते असे म्हटले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App