IMF : जगभरातील कोरोना विषाणूच्या साथीवर आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) एक मोठी लसीकरण योजना तयार केली आहे. आयएमएफने म्हटले की, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत जगभरातील सर्व पात्र लोकांना लसीकरण करण्यासाठी सुमारे 50 अब्ज डॉलर्सची आवश्यकता भासू शकते. आयएमएफने एका गुंतवणुकीचा कार्यक्रम प्रस्तावित केला आहे ज्याद्वारे जवळपास 9 ट्रिलियन डॉलर्सचा जागतिक आर्थिक लाभ होऊ शकतो. imf proposes vaccination plan for all around the world 50 billion dollars will be required
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जगभरातील कोरोना विषाणूच्या साथीवर आळा घालण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) एक मोठी लसीकरण योजना तयार केली आहे. आयएमएफने म्हटले की, पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत जगभरातील सर्व पात्र लोकांना लसीकरण करण्यासाठी सुमारे 50 अब्ज डॉलर्सची आवश्यकता भासू शकते. आयएमएफने एका गुंतवणुकीचा कार्यक्रम प्रस्तावित केला आहे ज्याद्वारे जवळपास 9 ट्रिलियन डॉलर्सचा जागतिक आर्थिक लाभ होऊ शकतो.
आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गीता गोपीनाथ आणि त्यांचे सहकारी रुचिर अग्रवाल यांनी तयार केलेल्या सविस्तर योजनेत 2021 पर्यंत सर्व देशांतील 40 टक्के आणि 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत 60 टक्के लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
आयएमएफच्या म्हणण्यानुसार, “लोकांचे जीवन व रोजगार वाचवण्यासाठी कोणत्याही जस्टिफिकेशनची गरज नसली पाहिजे. परंतु महामारीचा वेगाने अंत झाल्यास आर्थिक व्यवहारांत वाढ झाल्याने 2025 पर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेत 9 ट्रिलियन डॉलर्सची भर पडेल.”
प्रस्तावामध्ये असे म्हटले आहे की, ही आतापर्यंतची सर्वात जास्त पैसे देणारी सार्वजनिक गुंतवणूक असू शकते. हे लाभ मिळविण्यासाठीचा कालावधी जास्त नाही आणि आता कृती करण्याची आवश्यकता आहे. सुमारे 50 अब्ज डॉलर्सच्या या प्रस्तावाच्या एकूण खर्चामध्ये अनुदान, सरकारी संसाधने आणि सवलतीच्या मदतीचा समावेश असेल.
आयएमएफच्या म्हणण्यानुसार, “किमान 35 अब्ज डॉलर्सच्या निधीसाठी मजबूत आधार आहे. चांगली गोष्ट म्हणजे जी-20 देशांनी जवळपास 22 अब्ज डॉलर्सच्या अनुदानाच्या निधीतील तूट भरून काढण्यासाठी आधीच योजना आखल्या आहेत. अतिरिक्त 13 अब्ज डॉलर्सच्या अनुदानाची आवश्यकता आहे.”
आयएमएफने पुढे म्हटले की, “एकूण अर्थसाह्याच्या उर्वरित तब्बल 15 बिलियन डॉलर राष्ट्रीय सरकारांकडून येऊ शकतात. जे संभावित रूपाने बहुपक्षीय विकास बँकांद्वारे बनवण्यात आलेल्या कोरोना अर्थसाह्य सुविधेद्वारे समर्थित आहेत.”
प्रस्तावाच्या सूचनांमध्ये कोव्हॅक्सच्या अनुदानाचा उल्लेख आहे. कोव्हॅक्सच्या जागतिक पुढाकाराने 4 अब्ज डॉलर्सचे अनुदान विकसनशील देशांना लसी घेण्यास मदत करेल. आयएमएफच्या मते, यामुळे ऑर्डरला अंतिम रूप देण्यात आणि न वापरलेली लस क्षमता सक्रिय करण्यात मदत होईल.
महत्त्वाचे म्हणजे कोरोना विषाणूच्या साथीमुळे जगभरात 34 लाखांहून अधिक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक देशातील लोकसंख्येचा एक मोठा भाग लसीकरणासाठी संघर्ष करत आहे.
imf proposes vaccination plan for all around the world 50 billion dollars will be required
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App