“लाल समुद्रातील जहाजांवर हल्ले थांबवले नाहीत, तर…” ; अमेरिकेचा हुथी बंडखोरांना थेट इशारा!


अमेरिकेच्या नेतृत्वाखालील 12 देशांनी येमेनच्या हुथी बंडखोरांना संयुक्तपणे इशारा दिला आहे.


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लाल समुद्रावर हुथी बंडखोरांच्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने कडक धोरण अवलंबले आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील बारा देशांनी बुधवारी येमेनच्या हुथी बंडखोरांना संयुक्तपणे इशारा दिला, की जर त्यांनी लाल समुद्रातील जहाजांवरील हल्ले थांबवले नाहीत, तर त्यांना परिणामांना सामोरे जावे लागेल.If attacks on ships in the Red Sea are not stopped then Americas direct warning to Houthi rebels



“आमचा संदेश आता स्पष्ट आहे. आम्ही हे बेकायदेशीर हल्ले त्वरित थांबवण्याची आणि बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेली जहाजं आणि क्रूची सुटका करण्याची मागणी करतो आहेत.” असं व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटलं गेलं आहे.

याशिवाय निवेदनात म्हटले आहे की, “जर हुथी बंडखोरांनी जीव, जागतिक अर्थव्यवस्था आणि या प्रदेशातील महत्त्वाच्या जलमार्गांमधील वाणिज्य प्रवाह धोक्यात आणला तर परिणामांची जबाबदारी त्यांना घ्यावी लागेल.” हुथी बंडखोरांनी हल्ले सुरूच ठेवल्यास राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे प्रशासन बंडखोरांवर थेट हल्ला करण्याचा विचार करत असल्याच्या अनेक वृत्तानंतर हे विधान समोर आले आहे.

निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये ब्रिटनचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी आणि जपान यांच्यासोबत सामील झालेल्या ब्रिटनने सोमवारी हुथी बंडखोरांविरुद्ध “थेट कारवाई” करण्याचा इशारा दिला. तर बहरीन हा एकमेव प्रादेशिक देश होता ज्याने निवेदनावर स्वाक्षरी करून इतर देशांना पाठिंबा दिला. हुथींना पाठिंबा देणाऱ्या इराणसोबत बहरीनचे संबंध तणावपूर्ण आहेत.

If attacks on ships in the Red Sea are not stopped then Americas direct warning to Houthi rebels

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात