अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 832 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप; सर्व व्यवसायांवर बंदीची मागणी


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर सोमवारी न्यूयॉर्क न्यायालयात खटला उभा राहिला. ट्रम्प यांच्यावर 100 मिलियन डॉलर्स म्हणजेच 832 कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यांच्या जमिनी आणि मालमत्तेची खोटी माहिती पाहून त्यांनी आपली संपत्ती वाढवली आहे.Former US President Donald Trump accused of Rs 832 crore scam; Demand a ban on all businesses

न्यूयॉर्कचे अॅटर्नी जनरल लेटिया जेम्स यांनी ट्रम्प यांच्या विरोधात हा खटला दाखल केला असून त्यावर न्यायमूर्ती आर्थर एफ. अँगोरोन सुनावणी घेत आहेत. लेटिया यांनी ट्रम्प यांना सुमारे 250 मिलियन डॉलर्सचा दंड करावा अशी मागणी केली आहे.याशिवाय, त्यांनी ट्रम्प आणि त्यांची दोन मुले – डोनाल्ड जूनियर आणि एरिक यांच्या न्यूयॉर्कमधील सर्व व्यवसायांवर बंदी घालण्याचे आवाहनदेखील केले आहे. ट्रम्प आणि त्यांच्या संस्थेवर 5 वर्षांची व्यावसायिक रिअल इस्टेट बंदीदेखील लादण्यात यावी, असेही लेटिया यांनी म्हटले आहे.

ट्रम्प यांनी बँक कर्ज आणि विमा प्रीमियमसाठी त्यांच्या मालमत्तेचे मूल्य जास्त दाखवले
डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर 2011 ते 2021 दरम्यान बँक कर्ज आणि कमी विमा प्रीमियम मिळविण्यासाठी त्यांची मालमत्ता फुगवल्याचा आरोप आहे. ट्रम्प यांनी ट्रम्प टॉवर, मार-ए-लागो, त्यांची कार्यालये आणि गोल्फ क्लब यांसारख्या रिअल इस्टेट मालमत्तेचे मूल्य वाढवून त्यांची एकूण संपत्ती सुमारे 18.3 हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवली.

जानेवारीमध्ये, न्यूयॉर्कच्या न्यायाधीशांनी अॅटर्नी जनरलचा ट्रम्प यांच्याविरुद्धचा खटला फेटाळण्यास नकार दिला. या खटल्याच्या सुनावणीसाठी ऑक्टोबर महिना निवडण्यात आला होता. अॅटर्नी जनरल जेम्स यांचे प्रकरण दिवाणी आहे, त्यामुळे ट्रम्प यांच्यावर फौजदारी आरोप लावता येणार नाहीत.

ट्रम्प म्हणाले- माझ्यावर खोटे आरोप, अॅटर्नी जनरल आणि न्यायमूर्तींचा यात सहभाग

खटला सुरू होण्यापूर्वी ट्रम्प यांनी माध्यमांशी संवाद साधला. ट्रम्प म्हणाले- हे प्रकरण घोटाळा, लबाडी आणि राजकीय हल्ला आहे. डेमोक्रॅट स्वतः एक भ्रष्ट आणि भयंकर संघटना आहेत. न्यायमूर्ती आर्थर हेदेखील डेमोक्रॅट्सबद्दल पक्षपाती आहेत. त्यांना बडतर्फ केले पाहिजे.

ट्रम्प म्हणाले- आर्थर 2024च्या अध्यक्षीय निवडणुकीत हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत आहेत. मी भ्रष्ट डेमोक्रॅट्सपासून माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचे रक्षण करत आहे. या खटल्याबरोबरच ट्रम्प यांच्या निवडणूक प्रचारासाठी निधी उभारणीही सुरू झाली आहे.

Former US President Donald Trump accused of Rs 832 crore scam; Demand a ban on all businesses

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात