कोरोना महामारीच्या काळात सगळ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली होती. फेसबुक कपंनीने तर आता साथ कमी झाल्यावरही कर्मचाºयांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे. मात्र, कर्मचारी स्वस्त भागात राहायला गेल्यास त्याचा पगार कमी होणार आहे. याचे कारण म्हणजे कर्मचारी लांबच्या भागात राहावयास गेल्यावर ऑफिसमध्ये फिरकतही नाहीत. त्यामुळे टीम बिल्डींग होत नाही. Facebook says, work from home, but if you live in a cheap area, the salary will be lower
विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क : कोरोना महामारीच्या काळात सगळ्याच कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम म्हणजे वर्क फ्रॉम होम करण्याची परवानगी दिली होती. फेसबुक कपंनीने तर आता साथ कमी झाल्यावरही कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची परवानगी दिली आहे.
मात्र, कर्मचारी स्वस्त भागात राहायला गेल्यास त्याचा पगार कमी होणार आहे. याचे कारण म्हणजे कर्मचारी लांबच्या भागात राहावयास गेल्यावर ऑफीसमध्ये फिरकतही नाहीत. त्यामुळे टीम बिल्डींग होत नाही.
फेसबुक कंपनीच्या वतीने १५ जूनपासून कर्मचाऱ्यांनी विनंती केल्यास वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. मात्र, कंपनीला दिसून आले की अनेक कर्मचारी शहर सोडून ग्रामीण भागात राहावयास गेले आहेत. अंतर जास्त असल्यामुळे ते ऑफीसमध्ये फिरकतही नाहीत.
त्यामुळे कंपनीच्या कर्मचाऱ्यांचा एकमेंकांशी संवाद होत नाही. यामुळे संघभावना तयार होण्यास अडचणी येतात. टीम बिल्डींगसाठी कर्मचाºयांनी काही वेळा तरी ऑफिसमध्ये येण्यास प्रोत्साहनाचा भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
वास्तविक कर्मचाऱ्यांनी कार्यालयात येऊनच काम करावे, असे फेसबुकचे म्हणणे आहे. किमान अर्धवेळ तरी कार्यालयात यावे असे वाटते. त्यामुळे अमेरिकेतील आपली सर्व कार्यालये पन्नास टक्के क्षमतेने सुरू करण्याची तयारी फेसबुकने केली आहे. ऑक्टोबरपर्यंत कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू होतील.
फेसबुकमध्ये सध्या ६० हजारांवर कर्मचारी काम करत आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांच्या म्हणण्यानुसार किमान अर्ध्या कर्मचाऱ्यांनी वर्क फ्रॉम होम करायला हवे. ते म्हणाले, घरून काम केल्यामुळे माझ्या विचारप्रक्रियेला चालना मिळाली. त्याचबरोबर कुटुंबांसमवेत जास्त वेळ देता आला. मात्र, तरीही लीडरशिप टीमसोबत संवाद साधण्यासाठी तसेच प्लॅनींग करण्यासाठी नियमितपणे कार्यालयातही येत आहे.
त्याचबरोबर फेसबुकने आता आपल्या कर्मचाऱ्यांसाठी बदलीची सुविधाही सुरू केली आहे. अमेरिका, कॅनडा, मध्य पूर्व अशिया, अफ्रिक येथील कार्यालयांत कर्मचारी विनंती बदली मागू शकणार आहेत. लवकरच आणखी आठ देशांमध्येही बदली करून घेणे कर्मचाऱ्यांना शक्य होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App