विशेष प्रतिनिधी
न्यूयॉर्क – धोकादायक व्यक्ती आणि संघटनांची फेसबुकने केलेली गोपनीय यादी अमेरिकेतील द इंटरसेप्ट वृत्त संघटनेने फोडली आहे. त्यात भारतातील दहा संघटनांचा समावेश आहे.द इंटरसेप्टच्या वृत्तानुसार फेसबुकने सुमारे एक हजार सशस्त्र गटांवर बंदी घातली आहे.Face book made list for controversial organisations
गेल्या वर्षी फेसबुकने ६०० सशस्त्र सामाजिक संघटनांची यादी तयार केली होती. त्यांच्याशी संबंधित सुमारे २४०० पेजेस आणि त्यांच्याकडून चालविले जाणारे १४ हजार २०० ग्रुप्स हटविण्यात आले होते.
काळ्या यादीतील अर्ध्याहून जास्त व्यक्ती व संघटना संघटना पश्चिम आशिया, दक्षिण आशिया आणि मुस्लीम देशांतील आहेत. याशिवाय श्वेतवर्णीयांचा वर्चस्ववाद मानणारे गट, सशस्त्र सामाजिक संघटना आणि दहशतवाद्यांनाही या यादीत टाकण्यात आले. वं
चित गटांबाबत फेसबुकने खूप कठोर धोरणाचा अवलंब केल्याचे यातून स्पष्ट होते. काळ्या यादीतील व्यक्ती-संस्थांबाबत प्रशंसा, प्रतिनिधित्व आणि पाठिंबा देणे आपल्या व्यासपीठावरून शक्य होऊ नये म्हणून तशा मजकूरावर बंदी घातली जाते आणि काही पोस्ट झाल्यास मजकूर हटविला जातो असे फेसबुकचे संचालक ब्रायन फिशमन यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App