विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पाकिस्तानात नॅशनल असेंबलीच्या निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. परंतु संपूर्ण निवडणूकच लष्कराने आपल्या नियंत्रणाखाली घेतली असून लष्कराने “निवडणूक फिक्सिंग” करत कुणाला पंतप्रधान करायचे?, कोणाला विरोधी पक्ष नेता करायचे?, इथपर्यंतची तयारी केली असल्याचे मत भारतातील संरक्षण तज्ञांनी व्यक्त केले.Election Fixing” by the Army itself in Pakistan; Army’s efforts to mainstream terrorist organizations!!
पाकिस्तान मधली निवडणूक तशीही लष्कराच्या नियंत्रणाखाली होते, पण सध्या पाकिस्तानची आर्थिक हालत इतकी खस्ता आहे की तिथे दैनंदिन खर्च भागवायला सरकारी तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे लष्कराला देखील अंतर्गत प्रशासनात हस्तक्षेप करताना मर्यादा येतात. त्यामुळे लष्कराने फंडिंग करून ही सार्वत्रिक निवडणूक घ्यायला लावली. त्यामध्ये नवाज शरीफ यांना पंतप्रधानपदी निवडून आणायचे हे लष्कराने “फिक्स” केले आहे.
पाकिस्तानी लष्कराला तिथे असलेल्या दहशतवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणून पाकिस्तान वरचा आपला कंट्रोल अधिक मजबूत करायचा आहे आणि त्यातून काश्मीरमध्ये घातपाती कारवायांना ची चिथावणी द्यायची आहे, हे सगळे प्लॅनिंग नुसार सुरू आहे असे मत संरक्षण तज्ञ कमर चिमा यांनी सांगितले.
पाकिस्तानच्या निवडणुकांचे निकाल आधीच ठरलेले आहेत, पंतप्रधान कोण होणार?? प्रत्येक पक्ष किती जागा जिंकेल??, हे लष्कराने ठरविले आहे. माजी पंतप्रधान नवाझ शरीफ आणि बिलावल भुट्टो हे दोन प्रमुख उमेदवार आहेत. एकीकडे नवाझ शरीफ सर्वात मोठा पक्ष म्हणून उदयास येण्याचा प्रयत्न करत आहेत, पण जर त्यांनी आघाडी करून सरकार स्थापन केले, तर ते कदाचित त्यांची मुलगी मरियम नवाझ यांना बढती देऊन पंतप्रधान पदावर बसवू शकतात. नवाझ शरीफ यांचे पाकिस्तानी लष्करासोबतचे संबंध सुधारले आहेत, लष्कराने त्यांच्या कुटुंबाचे राजकीय पुनर्वसन होऊ दिले आहे आणि त्यांचे गुन्हे “माफ” केले आहेत.
#WATCH | Voters arrive at a polling booth in Islamabad, as parliamentary general elections get underway in Pakistan. (Source: Reuters) pic.twitter.com/twAWVomysU — ANI (@ANI) February 8, 2024
#WATCH | Voters arrive at a polling booth in Islamabad, as parliamentary general elections get underway in Pakistan.
(Source: Reuters) pic.twitter.com/twAWVomysU
— ANI (@ANI) February 8, 2024
पण निवडणुका झाल्या नवे सरकार आले तरी खैबर पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमधला थांबविणे कठीण आहे. पाकिस्तान मधले गंभीर आर्थिक संकट आणि राजकीय अस्थिरता पाहता सरकार चालवण्याची कसरत फार अवघड ठरणार आहे.
नवाझ शरीफ लष्कराचे डार्लिंग
पाकिस्तानी लष्कराला नवाझ शरीफ यांना पंतप्रधान पदी बसवायचे आहे. त्यांना फारसा विरोध होणार नाही हे लष्करानेच घडवून आणले आहे. एकदा आपल्या छत्रछायेखाली नवाज शरीफ पंतप्रधान झाले की पाकिस्तानी लष्कराला पुन्हा एकदा देशातील दहशतवादी संघटनांना मुख्य प्रवाहात आणायची मूभा मिळणार आहे. काश्मीरचा मुद्दा तापविणे हा या मागचा खरा हेतू आहे, असे निवृत्त ब्रिगेडियर अनिल गुप्ता यांनी स्पष्ट केले.
पण भारतासाठी काश्मीर हा मुद्दा नाही, तो होता, आहे आणि तो नेहमीच भारताचा अविभाज्य भाग राहील. संपूर्ण जम्मू आणि काश्मीर राज्य 1947 मध्ये भारतात सामील झाले होते, परंतु पाकिस्तान सरकारनेच हल्ले केले आणि राज्याच्या काही भागांवर बेकायदेशीरपणे कब्जा केला होता. तो भारत लवकरच सोडवेल. भारताच्या त्या योजनेत पाकिस्तानच्या निवडणुकांचा फरक पडणार नाही कारण भारताची तयारी पाकिस्तान पेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
लष्कराची पकड अधिक मजबूत
बलुचिस्तानात निवडणूक केंद्रे कमी ठेवून पाकिस्तानने पाकिस्तानी लष्कराने संपूर्ण निवडणूकच ताब्यात घेतली आहे तिथे इमरान खान यांच्या तहरीक ते इन्साफ पार्टीला बहुमत मिळण्याची शक्यता असल्याने पाकिस्तानी लष्कराने तिथली निवडणूक आधीच “फिक्स” करून टाकल्या आहेत, याकडे संरक्षण तज्ञ सुशांत सरीन यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानात निवडणूक झाली आणि नवे सरकार अस्तित्वात आले तरी देशाची अर्थव्यवस्था सावरणे त्या सरकारला शक्य होणार नाही. त्याचे परिणाम सततच्या हिंसाचारातच होत राहतील. त्यामुळे देखील अस्थिरतेत भर पडेल. निवडणुका मुळातच “फार्स” आहेत. त्यात निकाल “फिक्स” केल्याने फक्त सरकार बदलेल लष्करी राजवटीचा पंजा अधिक मजबूत होईल या पलीकडे त्यात काही नाही, असे परखड निरीक्षण सुशांत सरीन यांनी नोंदविले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App