निवडणुकीच्या एक दिवस आधी पाकिस्तानात दोन वेगवेगळ्या ठिकाणी मोठे स्फोट, २६ ठार


आधी या हल्ल्यांची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये गुरुवारी सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या एक दिवस आधी म्हणजे बुधवारी दोन ठिकाणी मोठे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये आतापर्यंत २६ जणांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटांमध्ये मोठ्या प्रमाणात लोक जखमीही झाले आहेत. A day before the election huge blasts in two different places in Pakistan 26 killed

बलुचिस्तानमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी हे स्फोट झाले. हे बॉम्बस्फोट एका राजकीय पक्षाच्या आणि एका अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक कार्यालयात झाला. प्रांतीय सरकारचे प्रवक्ते जान अचकाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिला हल्ला बलुचिस्तान प्रांतातील पशीन जिल्ह्यात झाला. या हल्ल्यात 14 जणांचा मृत्यू झाला.

जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे पोलिसांनी सांगितले. याशिवाय बलुचिस्तानमधील किला सैफुल्ला शहरातील राजकारणी फजलुर रहमान यांच्या जमियत उलेमा इस्लाम पार्टीच्या निवडणूक कार्यालयात झालेल्या बॉम्बस्फोटात किमान दहा जण ठार झाले.

पाकिस्तानमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या एक दिवस आधी या हल्ल्यांची जबाबदारी कोणीही स्वीकारलेली नाही. बलुचिस्तानमध्ये बराच काळ अस्वस्थता आहे. सरकारच्या कामावर इथली जनता खूश नाही. येथे सरकारच्या निषेधाचे आवाज वाढत आहेत. पाकिस्तान सरकारने येथे हजारो पोलिस आणि निमलष्करी दल तैनात केले आहेत. असे असतानाही येथे दररोज असे हल्ले होताना दिसत आहेत.

A day before the election huge blasts in two different places in Pakistan 26 killed

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात