जाणून घ्या नेमकं काय आहे प्रकरण आणि भारताच्या परराष्ट्र विभागाने काय म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : अरब देश कतारमध्ये गुरुवारी (26 ऑक्टोबर) 8 भारतीयांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या सर्वांवर हेरगिरीचे आरोप आहेत.आठ महिन्यांपूर्वी या भारतीय नौदलाच्या 8 माजी अधिकाऱ्यांना हेरगिरीच्या आरोपाखाली कतारमध्ये अटक करण्यात आली होती. Eight Ex Indian Navy Officers Sentenced to Death in Qatar
ही अटक गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये झाली होती. या प्रकरणी भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, फाशीच्या शिक्षेच्या निर्णयामुळे आम्ही आश्चर्यचकित आहोत. सविस्तर निर्णयाची प्रतीक्षा आहे.
परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, “आम्ही कुटुंबातील सदस्य आणि कायदेशीर टीमच्या संपर्कात आहोत आणि सर्व कायदेशीर पर्यायांचा शोध घेत आहोत.” आम्ही ही बाब अत्यंत महत्त्वाची मानतो आणि त्यावर बारीक लक्ष ठेवून आहोत. सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर सहाय्य प्रदान करणे सुरू ठेवेल. कतारी अधिकार्यांकडेही हा निर्णय मांडणार आहे.
या सर्व अधिकाऱ्यांनी भारतीय नौदलात वेगवेगळ्या पदांवर काम केले आहे. त्यांच्यावर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप आहे. या 8 जणांमध्ये प्रतिष्ठित अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांनी एकेकाळी मोठ्या भारतीय युद्धनौकांचे नेतृत्व केले होते. सध्या दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीज आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेससाठी ते कार्यरत होते. ही एक खासगी कंपनी आहे, जी कतारच्या सशस्त्र दलांना प्रशिक्षण आणि संबंधित सेवा पुरवते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App