विशेष प्रतिनिधी
नॉर्वे : हे जग खूप मोठे आहे. या जगामध्ये अनेक चित्र विचित्र घटना पाहायला मिळतात. या जगाची सुरुवात कधी झाली? अंत कधी झाला होणार? या सर्व गोष्टींची उत्सुकता आपल्या सर्वांनाच असते. तर जग कुठे संपते? हा प्रश्न ही तुम्हाला बऱ्याच वेळा पडला असणार. तर जग जिथे संपते तो रस्ता नॉर्वेमध्ये आहे. E69 या नावाने तो ओळखला जातो. 1992 मध्ये या रोडला E69 हे नाव देण्यात आले.
E69: The road leading to the end of the world
E69 हा उत्तर नॉर्वेमधील ओल्डरफजॉर्ड आणि नॉर्थ केप दरम्यानचा ई-रोड आहे. या रस्त्याची लांबी 129 किमी (80 मैल) इतकी आहे. या रोडवर 15.5 किमी लांबीचे (9.6 मैल) पाच बोगदे आहेत. नॉर्थ केप हा सर्वात लांब बोगदा आहे त्याची लांबी 6.9 किमी लांब इतकी आहे. आणि मुख्य म्हणजे हा रोड समुद्रसपाटी पासून 212 मीटर (696 फूट) खाली आहे.
हिवाळ्याच्या महिन्यांत हवामानाची परिस्थिती ठीक असेल तर ह्या रोडवर वाहने नेण्यास परवानगी दिली जाते. E69 हा जगातील सर्वात उत्तरेकडील रस्ता आहे. ज्याचा संबंध मोठ्या आंतरराष्ट्रीय रस्त्यांच्या नेटवर्कशी आहे.
चीनच्या Belt and Road प्रकल्पाला बायडेनचा काटशह; भारत अभ्यासानंतर Build back better for the world प्रकल्पात सामील होणार
याठिकाणी पृथ्वी आपल्या अक्षाभोवती फिरते. हे ठिकाण नॉर्वे या देशांमध्ये येते. आणि मुख्य गोष्ट अशी की येथे सहा महिने अंधार आणि सहा महिने प्रकाश असतो. त्यामुळे लोकांना सहा महिने अंधारामध्ये राहावे लागते.
नॉर्वेमधील हा शेवटचा रस्ता आहे. यापुढे जाण्यासाठी कोणताही रस्ता नाहीये. आणि त्याच्यासाठी परवानगीदेखील नाहीये. कारण संपूर्ण भाग हा बर्फाने आच्छादलेल्या असतो आणि त्याच्यापुढे समुद्र आहे.
जगातील शेवटचा रस्ता. जग जिथे संपते तो रस्ता पाहण्याची इच्छा आपल्यातील प्रत्येकाला झाली असेल. तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती. या रस्त्यावर एकट्याने जाण्यास अजिबात परवानगी नाहीये. जर तुम्हाला तिकडे भेट द्यायची असेल तर तुम्हाला ग्रुपने जावे लागते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App