विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – कोणत्याही प्रतिकारविना तालिबानला काबूलवर ताबा मिळणे हा अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव असल्याचे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे. अध्यक्ष बायडेन यांनी अफगाणिस्तानला ज्या रीतीने वाऱ्यावर सोडले, ते ऐतिहासिक आहे, अशा शब्दात ट्रम्प यांनी टीका केली आहे.Donald Trump targets Biden on Taliban
ट्रम्प यांनी बायडेन यांच्या राजीमान्याची मागणी करत म्हटले की, बायडेन यांनी अफगाणिस्तानसमवेत जे धोरण राबविले ते खरोखरच ऐतिहासिक आहे. बायडेन यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. कारण अफगाणिस्तानात जे होऊ द्यायचे नव्हते, ते सर्वकाही घडले आहे.
काबूल तालिबानच्या ताब्यात जाणे हे बायडेन सरकारचे मोठे अपयश आहे. तेथून सुरक्षितपणे निघण्यासाठी तालिबानला भीक मागणे देखील दुर्दैवी आहे. ज्या अमेरिकी सैनिकांनी अफगाणिस्तानसाठी बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबीयांनी देखील अशा स्थितीची कल्पना केली नसेल.
माजी परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी म्हटले की, सध्या मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या कमांडर इन चीफसमवेत मंत्री असतो तर अमेरिकेविरोधात कट रचण्याचे काय परिणाम असतात, हे तालिबानला दाखवून दिले असते. कासीम सुलमानी याला धडा शिकवला होता. तालिबानला देखील अमेरिकेने हिसका दाखवला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App