विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन : अमेरिकेचे माजी संरक्षण मंत्री व रिपब्लिकन पक्षाचे नेते डोनाल्ड रम्सफिल्ड (वय ८८) यांचे निधन झाले. इराक युद्धामुळे रम्सफिल्ड यांचे नाव जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचले होते. कुशल प्रशासक आणि अमेरिकेच्या लष्कराच्या आधुनिकीकरणाला वेग आणणारे म्हणून ओळखले जाणारे रम्सफिल्ड हे इराक युद्धालाही कारणीभूत असल्याचे मानले जाते.Donald Ramshfild no more
इराकचे तत्कालिन हुकमुशहा सद्दाम हुसेन यांना वठणीवर आणण्याची भाषा करण्यात रम्सफिल्ड सर्वांत आघाडीवर होते. इराकने कुवेतवर आक्रमण केल्यानंतर रम्सफिल्ड यांच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने इराकविरुद्ध युद्ध पुकारले आणि सद्दाम राजवटीचा पाडाव केला.
दोन वेळेस संरक्षण मंत्रिपद सांभाळणारे ते एकमेव नेते होते. १९७५ ते ७७ या काळात ते अमेरिकी इतिहासातील सर्वांत युवा संरक्षणमंत्री होते, तर २००१-२००६ या काळात ते सर्वांधिक वयाचे संरक्षण मंत्री होते. त्यांनी १९८८ मध्ये अध्यक्षपदासाठीही निवडणूक लढविली होती. मात्र त्यात त्यांना अपय़श आले होते.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App