वृत्तसंस्था
बर्लिन – युरोपात विशेषत: जर्मनीत कोरोनाने पुन्हा हाहाकार माजविला आहे. गेल्या चोवीस तासात ५० हजाराहून अधिक नवीन रुग्ण आढळून आले आहेत. गेल्या दीड वर्षातील हा सर्वोच्च आकडा मानला जात आहे. तसेच चोवीस तासात २३५ जणांचा मृत्यू झाला आहे.Corona speed in Germany once again
जर्मनीचे नामांकित ख्रिश्चि.यन ड्रॉस्ट्रन यांनी आगामी काळात मृतांचा आकडा एक लाखांचा आकडा पार करेल, अशी भीती व्यक्त केली. जर्मनीच्या सॅक्सोनी राज्यात पॉझिटिव्हीटीचा दर सर्वाधिक आहे. गेल्या सात दिवसात दररोज एक लाख लोकांमागे ४५९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे या राज्यात लस न घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाण्यास मनाई करण्यात आली आहे.
लसीकरणाचा दर हा ७० टक्कयांपेक्षा कमी असल्यामुळे सरकारकडून लस घेण्याबाबत वारंवार आवाहन केले जात आहे. लस न घेतलेल्या व्यक्तींसाठी आगामी काळात संसर्ग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
सप्टेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुकीनंतर कोरोनाच्या रुग्णांत वाढ झाली आहे. अनेक राजकीय पक्षांनी लसीकरणाला विरोध केला आहे. सत्तेत आल्यानंतर कोणत्याही प्रकारचे लॉकडाउन लागू केला जाणार नाही, असे या पक्षाकडून सांगण्यात येत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App