विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – जगभरात गेल्या चोवीस तासात ४ लाख ६८ हजार लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेले असताना यादरम्यान साडेतीन लाख लोकांनी कोरोनावर मात केली. तसेच ८ हजाराहून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक रुग्ण ब्राझीलमध्ये आढळून आले. ब्राझीलमध्ये गेल्या चोवीस तासात ५३ हजार ७४९ रुग्ण आढळून आले आहेत. तर इंडोनेशियात ३८ हजार ३९१ रुग्णांची नव्याने भर पडली आहे. Corona increasing very fast in Brazil
ब्रिटनची स्थिती बिघडत चालली आहे. काल चोवीस तासात ३२,५५१ जणांना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. बुधवारी देखील ३२ हजाराहून अधिक जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे येत्या १९ जुलैपासून अनलॉक होण्याच्या घोषणेबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे कोरोना योद्ध्याच्या सन्मानार्थ ‘टिकर टेप परेड’ करण्यात आली. यात शेकडो नागरिक सहभागी झाले होते. त्याचे आयोजन मॅनहटन येथे करण्यात आले. यादरम्यान लोकांनी आरोग्य, परिवहन, शिक्षण, अन्य आपत्ती व्यवस्थापन सेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App