विशेष प्रतिनिधी
वॉशिंग्टन – चीनची अण्वस्त्रांची ताकद वेगाने वाढत आहे. २०३० पर्यंत एक हजार आण्विक शस्त्रांची निर्मिती करण्याचे चीनचे ध्येय आहे, असा दावा ‘पेंटॅगॉन’ या अमेरिकेच्या संरक्षण विभागाच्या मुख्यालयाच्या अहवालात केला आहे.China increases speed of making atomic wepons
आण्विक शस्त्रांच्या निर्मितीचा चीनचा वेग पाहता २०२७ पर्यंत त्यांच्याकडे ३०० अण्वस्त्र असतील तर २०३० पर्यंत ४०० अण्वस्त्र असतील, असा अंदाज अमेरिकेच्या संरक्षण विभागाने एक वर्षापूर्वी व्यक्त केला होता. मात्र त्यापेक्षा कितीतरी पट जास्त वेगाने चीन त्यांच्या आण्विक शक्तीत वाढ करीत आहे, असे अहवालात म्हटले आहे.
या शतकाच्या अखेरपर्यंत अमेरिकेच्या जागतिक महासत्तेच्या बरोबरीने येणे किंवा त्यापेक्षाही पुढे जाण्याची चीनची महत्त्वाकांक्षा आहे, असे यात नमूद केले आहे.अण्वस्त्र सोडण्यासाठी जमीन, समुद्र आणि हवाई तळांच्या संख्येवत चीन वाढ करीत असून त्यात मोठी गुंतवणूक करीत आहे. या विस्तारीकरणासाठी आवश्य्क पायाभूत सुविधांची उभारणीही सुरू आहे.
अमेरिकेकडे तीन हजार ७५० अण्वस्त्रे आहेत. त्यात वाढ करण्याची त्यांची कोणतीही योजना नसल्याचे सांगण्यात येते. २००३ पर्यंत अमेरिकेकडे एकूण दहा हजार शस्त्रास्त्रे होती. बायडेन प्रशासन त्यांच्या देशाच्या आण्विक धोरणावर व्यापक विचार करीत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App