बीजिंग – नव्वद दिवसांची अंतराळ मोहीम यशस्वी करणारे चीनचे तीन अंतराळवीर सुखरूपरित्या परतले. नी हाइशेंग, लियू बोमिंग आणि टँग होंगबो हे अंतराळवीर स्थानिक वेळेनुसार दुपारी दीड वाजता शेनझोऊ-१२ यानातून गोबी वाळवंटात उतरले.China astronauts did historic spacewalk
सरकारी दूरचित्रवाणी सीसीटीव्हीने अंतराळयानाचे पॅराशूटिंगचे फुटेज प्रसारित केले. १७ जून रोजी अंतराळ मोहीम सुरू झाली होती. मोहिमेचे प्रमुख नी हाइशेंग आणि लियू बोमिंग व टँग यांनी स्पेसवॉकही केला.
त्यांनी अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी व्हिडिओ कॉलवरून संवाद देखील साधला आणि अंतराळ कार्यक्रमाची माहिती दिली.चीनने २००३ पासून आतापर्यंत चौदा अंतराळवीरांना अवकाशात पाठवले आहे.
त्याचबरोबर स्वतंत्रपणे अंतराळ स्थानक उभारणारा चीन हा पूर्वीचा सोव्हिएत संघ आणि अमेरिकेनंतरचा जगातला तिसरा देश ठरला आहे. अंतराळवीरांना पुन्हा ९० दिवसांच्या मोहिमेवर पुढील दोन वर्षात अंतराळ स्थानकावर पाठवण्यात येणार आहे. पुढील वर्षी अंतराळस्थानक कार्यान्वित होईल अशी अपेक्षा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App