कोरोनाची हाताळणी ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांना चांगलीच भोवणार

विशेष प्रतिनिधी

साओ पावलो – कोरोनाच्या जागतिक साथीच्या कालावधीत असंख्य वेळा केलेले नियमभंग ब्राझीलचे अध्यक्ष जाईर बोल्सोनारो यांना भोवणार आहेत. त्यांच्याविरुद्ध बाराशे पानी चौकशी अहवाल तयार करण्यात आला असून हेतुपुरस्सर गुन्ह्यांसह त्यांच्याविरुद्ध नऊ आरोप दाखल केले जाणार आहेत.Brazil president gets in trouble

मवाळ विचारसरणीचे संसद सदस्य रेनन कॅलैरॉस यांच्या नेतृत्वाखाली हा अहवाल तयार करण्यात आला. अनेक मंत्री तसेच बोल्सोनारो यांच्या तीन मुलांविरुद्धही आरोप दाखल करावेत अशी शिफारस अहवालात केली जाण्याची शक्यता आहे. यात फ्लॅव्हीयो हा बोल्सोनारो यांचा मुलगा एका समितीचा सदस्य आहे.



हा अहवाल सरकारी वकील, मुख्य न्यायालयाला पाठविला जाईल. याशिवाय हेगमधील आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयासही तो पाठविला जाऊ शकतो. त्या न्यायालयात बोल्सोनारो यांच्याविरुद्धच्या तक्रारी यापूर्वीच दाखल करण्यात आल्या आहेत.

बोल्सोनारो यांच्याविरुद्ध भोंदूगिरी, मानवतेविरुद्ध गुन्हा असे आरोप आहेत. मनुष्यवध आणि नरसंहार अशा आरोपांचा उल्लेख अखेरच्या क्षणी मागे घेण्यात आले. चौकशी आयोगातील गटबाजीच यास कारणीभूत होती.

Brazil president gets in trouble

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात