विशेष प्रतिनिधी
ऐजवाल – बांधकाम साहित्याची चोरी केल्याप्रकरणी आसाम पोलिसांविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असे स्पष्टीकरण मिझोराम पोलिसांनी दिले. पुलाच्या बांधकामासाठीचे हे साहित्य मिझोराम पोलिसांकडे सुपूर्द केल्याची माहिती राज्यातील कोलासिब जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिली.Assam – Mizo police tension get melted
आसाम व मिझोराम या दोन एकमेकांशेजारी असलेल्या राज्यात बांधकाम साहित्याच्या चोरीवरून नवीन वाद निर्माण झाला होता. आसामने आपल्या हद्दीतून पुलाच्या बांधकामाचे साहित्य चोरल्याचा दावा मिझोराम सरकारने केला होता. आसाम पोलिसांनी मिझोराममधील बैराबी शहराजवळील झोफाई गावात प्रवेश करून हे साहित्य चोरल्याचा दावा मिझोरामच्या कोलासिबच्या उपायुक्तांनी केला होता.
याप्रकरणी आसाम पोलिसांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून तो आता मागे घेता येऊ शकत नाही. मात्र, याप्रकरणी अधिक तपास किंवा पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार नाही, असेही त्यांनी सांगितले. मिझोरामच्या झोफाईची सीमा आसाममधील हैलाकंडी जिल्ह्यातील कचुरथालला लागून आहे. यासंदर्भात कोलासिबच्या उपायुक्तांनी आसामच्या हैलाकंडीच्या उपायुक्तांनाही पत्र लिहून आवश्यक कारवाईची मागणी केली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App