इराण वरील हल्ला जितका अमेरिकन वर्चस्ववादाचा नमुना; तितकाच तो इस्लामी दहशतवादाला दणका!!

Iran strike

नाशिक : इराण वरील हल्ला जितका अमेरिकन वर्चस्ववादाचा नमुना; तितकाच तो इस्लामी दहशतवादाला दणका!!, ही वस्तुस्थिती नाकारण्यात मतलब नाही.The attack on Iran is as much an example of American hegemony as it is a blow to Islamic terrorism!!

– लिबरल लोकांना इराणचा पुळका

अमेरिकेने इराणवर हल्ला करून आयतुल्लाह खामेनी आणि त्याच्या सहकाऱ्यांना मारल्यानंतर भारतातल्या लिबरल लोकांनी अमेरिकेच्या वर्चस्ववादाविरुद्ध प्रतिक्रिया व्यक्त केल्या. त्यामध्ये नेहमीप्रमाणे जावेद अख्तर, रवीश कुमार, आशुतोष, अरफा खानम, स्वरा भास्कर वगैरेंचा समावेश होता. या सगळ्यांनी आयतुल्लाह खामेनी अमेरिकेविरुद्ध लढलेल्या युद्धात “शहीद” झाले, असा दावा केला. या सगळ्यांनी अमेरिकन वर्चस्ववादाचा निषेध केला. त्यातही जावेद अख्तर यांनी पुढे जाऊन मोठ्या राजकीय विश्लेषकाचा आव आणत डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यनाहू यांच्यासारख्या गुंडांना वेळीच आवरले नाही, तर चीनची जगातली विश्वासार्हता संपुष्टात येईल, असे ट्विट केले. थोडक्यात डोनाल्ड ट्रम्प आणि बेंजामिन नेत्यानाहू यांना चीननेच आवरावे. त्यांना फक्त चीनच अटकाव करू शकतो, असा दावा जावेद अख्तर यांनी केला. जो बिलकुलच वस्तुस्थितीला धरून नाही.



– चीनचा फुगा फुटला

जावेद अख्तर आणि अन्य लिबरल लोकांना चीनच्या सामर्थ्याविषयी चिन्यांपेक्षाही जास्त खात्री असल्याचे दिसते वास्तविक चिनी तंत्रज्ञान, चिनी बनावटीची शस्त्रास्त्रे आणि चीनचा एकूणच राजकीय वर्चस्ववाद याची पोल पाकिस्तान आणि इराण यांच्यावरच्या हल्ल्यानंतर आधीच खोलली गेली भारताने पाकिस्तान विरुद्ध ऑपरेशन सिंदूर केल्याच्या वेळी पाकिस्तानला चिनी शस्त्रास्त्रे वाचवू शकले नाहीत. चीनची एअर डिफेन्स सिस्टीम पाकिस्तानच्या कामी येऊ शकली नाही. चीनने पाकिस्तानला दिलेली विमाने आणि क्षेपणास्त्रे भारताविरुद्ध लढाई करण्यात अपयशी ठरली.

– खामेनीला चिनी शस्त्रास्त्रे वाचवू शकली नाहीत

इराणला सुद्धा तेलाच्या बदल्यात शस्त्रास्त्रे या कराराच्या नावाखाली चीनने भरपूर क्षेपणास्त्रे पुरविली होती. अन्य शस्त्र सामग्री पुरविली होती, पण इराणला अमेरिका आणि इस्रायल यांच्या हल्ल्यांना तोंड देताना चिनी बनावटीची कुठलीच अस्त्रे किंवा शस्त्रे उपयोगाला आली नाहीत. आयतुल्लाह खामेनी याला चिनी बनावटीची शस्त्रे वाचवू शकली नाहीत.

– चिनी राज्यकर्त्यांबाबत भ्रमनिरास

पाकिस्तान आणि इराण यांच्यावर लष्करी कारवाई होताना चिनी राज्यकर्ते या दोन्ही देशांच्या प्रत्यक्ष मदतीला पोहोचले नाहीत. तरीसुद्धा भारतातल्या लिबरल लोकांना अमेरिका आणि इजरायल यांना रोखण्याची चीनमध्ये क्षमता असल्याचा भ्रम झालाय आणि तोच जावेद अख्तर यांच्या ट्विट मधून समोर आला.

– वास्तव राजकारण

भारतातल्या लिबरल लोकांना या सगळ्या प्रकाराबद्दल काहीही वाटत असले आणि चीन विषयक त्यांनी कुठलाही भ्रम पाळला असला, तरी अमेरिकेचा इराण वरचा हल्ला हा अमेरिकन वर्चस्ववादाचा जेवढा नमुना आहे, तेवढाच तो इस्लामी दहशतवादाला दणका सुद्धा आहे हे मान्य करावे लागेल. कारण इराण मधली खामेनींची राजवट ही काही धर्मनिरपेक्ष लोकशाहीवादी राजवट नव्हती. ती इस्लामी कट्टरवादाचेच प्रतीक होती आणि आहे. खामेंनींच्या राजवटीत इराणमध्ये लोकशाही आणि राजेशाही गुंडाळून इस्लामी राजकीय व्यवस्था उत्पन्न झाली. त्या राजवटीने इराणी जनतेवर आणि महिलांवर बंधने लादली. तेलातून मिळवलेल्या पैसा खामेनींच्या राजवटीने वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांना दिला. त्या दहशतवादी संघटनांनी जगभर धुमाकूळ घातला. त्यामुळे खामेनी यांचा अस्त हा अमेरिकन वर्चस्ववादाचा जेवढा नमुना आहे, तेवढाच तो इस्लामी दहशतवादाला सुद्धा दणका आहे, ही वस्तुस्थिती मान्य करावी लागते. फक्त ही वस्तुस्थिती भारतातल्या लिबरल लोकांना पचणारी नाही.

The attack on Iran is as much an example of American hegemony as it is a blow to Islamic terrorism!!

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात