चिनी परराष्ट्र मंत्र्यांनंतर चिनी संरक्षण मंत्रीही “गायब”; शी जिनपिंगांचे वर्चस्व पडतेय ढिल्ले, म्हणून आवळतोय फास!!

वृत्तसंस्था

टोकियो : चीनमध्ये आर्थिक मंदीचा दौर गहरा होत असताना राजकीय अस्वस्थतेच्या बातम्या समोर येत आहेत. चिनी परराष्ट्र मंत्री किन गँग यांच्या गायब होण्यानंतर आता चिनी संरक्षण मंत्री ली शांगफू हे देखील गायब झाल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. After Chinese foreign minister disappeared, now Chinese defence minister is also disappeared

मात्र चिनी कम्युनिस्ट पक्षाची पोलादी राजवट एवढ एवढी बंदिस्त आहे की या दोन अतिवरिष्ठ मंत्र्यांच्या गायब होण्याचा साधा खुलासाही चिनी कम्युनिस्ट राजवटीने केलेला नाही.

भारताच्या अध्यक्षतेखाली g20 परिषद यशस्वी झाली. त्यावेळी भारत पश्चिम आशिया युरोप कॉरिडॉर करार झाला. त्यामुळे चीनच्या महत्त्वाकांक्षी बेट अँड रोड इनिशिएटिव्हला धक्का बसला चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग g20 परिषदेला भारतात आले नाही याचे “हे रहस्य” परिषदेच्या समाप्तीनंतर उघड झाले. पण त्यापलीकडे जाऊन शी जिनपिंग यांच्या मंत्रिमंडळातले संरक्षण मंत्री ली शांगफू गायब झाल्याची बातमी आली.

वास्तविक शी जिनपिंग तहहयात अध्यक्ष झाल्यानंतर काहीच महिन्यांपूर्वी त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाची फेररचना करून नवे पंतप्रधान, नवे परराष्ट्रमंत्री, नवे संरक्षण मंत्री नेमले होते. परंतु अवघ्या सहा – आठ महिन्यांमध्येच त्यांची सरकारवरची पकड सुटते आहे की काय, की वर्चस्ववादी कम्युनिस्ट राजवटीच्या पद्धतीनुसार शी जिनपिंग यांची पकड मजबूत होऊन ते आपल्याच नेमलेल्या सहकाऱ्यांभोवती चौकशी आणि तपासाचे फास आवडत आहेत का??, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय मुत्सद्दी वर्तुळात सुरू झाली आहे.



संरक्षण मंत्री ली शांगफू हे अनेक वर्षांपासून सर्व मंत्रालयात कार्यरत आहेत. त्यांची 2017 पासून संरक्षण साहित्य खरेदीतल्या घोटाळ्यात चौकशी देखील सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ते गायब झाले आहेत का??, की त्यामागे काही आणखी वेगळे कारण आहे??, अशी चर्चा आंतरराष्ट्रीय सामाजिक वर्तुळात आहे.

त्याच वेळी चीनमध्ये आर्थिक मंदीचा दौर गहिरा झाल्यामुळे राजकीय, सामाजिक आणि आर्थिक अस्वस्थता शिगेला पोहोचत आहे. त्यातून शी जिनपिंग यांच्या विरोधात काही राजकीय गंभीर हालचाली होत आहेत का?? आणि त्यालाच काटशह देण्यासाठी परराष्ट्र मंत्री आणि संरक्षण मंत्री यांच्यासारख्या वरिष्ठ मंत्र्यांना शी जिनपिंग समर्थक गायब करत आहेत का?? अशीही जोरदार चर्चा आंतरराष्ट्रीय मुसदी वर्तुळात सुरू आहे

अमेरिकेचे जपान मधील राजदूत रेहम इमॅन्युल

चिनी संरक्षण मंत्री ली शांगफू यांच्या “गायब” होण्यासंदर्भात एक ट्विट केले. यात त्यांनी चिनी सरकारची तुलना अगाथा ख्रिस्टी यांची कादंबरी “देन देअर वेअर नन” शी केली. प्रथम, परराष्ट्र मंत्री किन गँग बेपत्ता झाले, नंतर रॉकेट फोर्सचे कमांडर बेपत्ता झाले आणि आता संरक्षण मंत्री ली शांगफू दोन आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत. बेरोजगारीची ही शर्यत कोण जिंकणार?? चीनचे तरुण की शी जिनपिंग यांचे सरकार??, असा बोचरा सवाल त्यांनी केला त्यामुळे चिनी संरक्षण मंत्र्यांच्या गायब होण्यामागचे राजकीय गूढ अधिक वाढले आहे.

#MysteryInBeijingBuilding

After Chinese foreign minister disappeared, now Chinese defence minister is also disappeared

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात