Kabul Airport : काबूल विमानतळावर अज्ञात हल्लेखोरांशी झालेल्या चकमकीत अफगाण सुरक्षा दलाचा एक सदस्य ठार झाला आहे, तर तीन सैनिक जखमी झाले आहेत. जर्मन लष्कराने ट्विट करून ही माहिती दिली आहे. जर्मन लष्कराने ट्विट करून म्हटले की, अमेरिकन आणि जर्मन फौजेसुद्धा लढ्यात सहभागी आहेत आणि आमचे सर्व सैनिक सुरक्षित आहेत. हा हल्ला करणारे हल्लेखोर कोण आहेत याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, काही काळासाठी संशयाची सुई तालिबानकडे वळलेली आहे, त्यांनी काबूल विमानतळाला वेढा घातलेला आहे. Afghanistan 1 Afghan security force member killed 3 hurt in firefight at Kabul airport
वृत्तसंस्था
काबूल : काबूल विमानतळावर अज्ञात हल्लेखोरांशी झालेल्या चकमकीत अफगाण सुरक्षा दलाचा एक सदस्य ठार झाला आहे, तर तीन सैनिक जखमी झाले आहेत. जर्मन लष्कराने ट्विट करून ही माहिती दिली आहे. जर्मन लष्कराने ट्विट करून म्हटले की, अमेरिकन आणि जर्मन फौजेसुद्धा लढ्यात सहभागी आहेत आणि आमचे सर्व सैनिक सुरक्षित आहेत. हा हल्ला करणारे हल्लेखोर कोण आहेत याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाही. मात्र, काही काळासाठी संशयाची सुई तालिबानकडे वळलेली आहे, त्यांनी काबूल विमानतळाला वेढा घातलेला आहे.
रविवारी काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर प्रवेश करण्याच्या प्रयत्नात चेंगराचेंगरी आणि गोळीबारात सात जण ठार झाल्याचे ब्रिटिश सैन्याने सांगितले. गेल्या रविवारी काबूल ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांनी विमानतळाला वेढा घातला आहे. त्याचबरोबर तालिबानचे पुनरागमन आणि अफगाणिस्तान सरकार पडल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हेच कारण आहे की, मोठ्या संख्येने लोक देश सोडण्याचा प्रयत्न करत आहेत आणि यासाठी विमानतळावर पोहोचत आहेत.
अमेरिका आणि मित्र राष्ट्रांनी 20 वर्षांनंतर अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घ्यायला सुरुवात केली आहे. राष्ट्रपती जो बायडेन यांच्या प्रशासनाने सैन्य मागे घेण्याची 31 ऑगस्टची मुदत निश्चित केली आहे. मात्र, बदलत्या परिस्थितीचा विचार करता अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेण्याची तारीख आणखी वाढवली जाऊ शकते. बायडेन यांनी रविवारी म्हटले की, आम्ही अमेरिकन लोकांच्या एका गटाला सुरक्षित आणि प्रभावीपणे बाहेर काढण्यासाठी काबूल विमानतळ कंपाऊंडमध्ये हलवले आहे. ज्या अमेरिकन लोकांना घरी परत यायचे आहे, त्यांना परत आणले जाईल.
Afghanistan 1 Afghan security force member killed 3 hurt in firefight at Kabul airport
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App