पाकिस्तानचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादिर खान यांचे रविवारी वयाच्या 85व्या वर्षी प्रकृती बिघडल्याने निधन झाले. खान यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक मानले जाते. पाकिस्तानला मुस्लिम जगातील पहिला अण्वस्त्रधारी देश बनवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पाकिस्तानी जनता त्यांच्याकडे हीरो म्हणून पाहते. डॉक्टर अब्दुल कादिर खान यांची प्रकृती शनिवारी रात्री खालावली होती. यानंतर त्यांना रविवारी सकाळी रुग्णालयात हलवण्यात आले.Abdul Qadir Khan the maker of nuclear weapons for Pakistan died today
वृत्तसंस्था
इस्लामाबाद : पाकिस्तानचे प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ डॉ. अब्दुल कादिर खान यांचे रविवारी वयाच्या 85व्या वर्षी प्रकृती बिघडल्याने निधन झाले. खान यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे जनक मानले जाते. पाकिस्तानला मुस्लिम जगातील पहिला अण्वस्त्रधारी देश बनवण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. पाकिस्तानी जनता त्यांच्याकडे हीरो म्हणून पाहते. डॉक्टर अब्दुल कादिर खान यांची प्रकृती शनिवारी रात्री खालावली होती. यानंतर त्यांना रविवारी सकाळी रुग्णालयात हलवण्यात आले.
त्यांना श्वास घेण्यास त्रास होत होता, त्यानंतर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले. तथापि, त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांच्या फुफ्फुसात रक्तस्राव होऊ लागला. त्यांचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टरांनी सर्वतोपरी प्रयत्न केले, पण त्यांना यश आले नाही. स्थानिक वेळेनुसार सकाळी 7:04 वाजता त्यांचे निधन झाले. डॉक्टरांनी सांगितले की, अब्दुल कादिर यांचा मृत्यू फुफ्फुसे निकामी झाल्यामुळे झाला.
भारताच्या भोपाळ शहरात जन्म
मे 1998 मध्ये जेव्हा पाकिस्तानने पहिली अणुचाचणी घेतली तेव्हा डॉ. अब्दुल कादिर खान एका रात्रीत पाकिस्तानमध्ये राष्ट्रीय हीरो बनले. आण्विक चाचण्यांनंतर पाकिस्तान मुस्लिम जगातील एकमेव अणुशक्ती बनला आणि अण्वस्त्रे असणारा सातवा देश बनला. डॉ. खान यांचा जन्म 1936 मध्ये भारताच्या भोपाळ शहरात झाला. पण फाळणीनंतर खान आपल्या कुटुंबासह पाकिस्तानात गेले. डॉ. खान यांनी आपले सुरुवातीचे शिक्षण कराचीच्या डीजे सायन्स कॉलेजमधून घेतले. त्यानंतर 1961 मध्ये ते उच्च शिक्षणासाठी युरोपला गेले आणि जर्मनी आणि हॉलंडमधील विद्यापीठातून पीएचडी केली.
अब्दुल कादिर खान यांच्यावर पश्चिमात्य देशांकडून कायम टीका करण्यात आली. त्यांनी इतर देशांनाही गुप्तपणे अणु तंत्रज्ञान विकल्याचा आरोप करण्यात आला. 2004 मध्ये अब्दुल कादिर खानवर अणु तंत्रज्ञानाची तस्करी केल्याचा आरोपही होता. एवढेच नाही, तर अब्दुल कादिर खान यांनीही याप्रकरणी आपली चूक मान्य केली होती. त्यांनी हे तंत्रज्ञान उत्तर कोरियाला विकल्याचाही आरोप झाला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App