गाडी घेण्यासाठी तीस लाख रुपयांचे बिनव्याजी कर्जास नकार;बबनराव लोणीकरांचा आदर्श इतर आमदार घेणार का?


प्रतिनिधी

औरंगाबाद : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदारांना गाडी घेण्यासाठी तीस लाख रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्याची घोषणा अर्थसंकल्पात केल्यानंतर त्यावर सर्वसामान्य जनतेतून टीकेची झोड उठली. आमदारांना जनतेच्या फुकट पैशांची गरज आहे का येथपासून हा पैसा सामान्यांसाठी वापरा, अशा सूचना त्यावर येत आहेत.

या पार्श्वभूमीवर माजी मंत्री व परतूर विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे आमदार बबनराव लोणीकर सरकार देऊ करत असलेली तीस लाखांची मदत घेणार नसल्याची घोषणा केली आहे.

“मी सर्व सामान्य जनतेचा लोकप्रतिनिधी म्हणून, ज्या जनतेने विश्वासाने 2014 व 2019 विधानसभा निवडणुकीत मला प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. राज्यात सत्तेमध्ये असलेल्या महाआघाडी सरकारने विधानसभा आमदाराना गाडी खरेदी साठी 30 लाख रुपयाचे कर्ज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयावर मी माझे मत व्यक्त करावे असे मनोमन वाटले म्हणून सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपणा सर्वाना सांगू इच्छितो कि, हा पैसा जनतेचा आहे. जनतेच्या पैशाने तीस लाख रुपयांची गाडी मी गाडी घेणार नाही. कारण; याचे व्याज सरकार भरणार आहे. म्हणजे पैसा जनतेच्या तिजोरीतला आहे….!! मला जनतेच्या पैशाने किंवा सरकारच्या पैशाने गाडी खरेदी करायची नाही, मी घेणार नाही,” असे लोणीकर यांनी जाहीर केले आहे.

अर्थातच लोणीकरांच्या या भूमिकेला नेटकर्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे. ‘योग्य निर्णय,’ या आशयाच्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त झाल्या आहेत. त्यामुळे लोणीकरांनी घालून दिलेला आदर्श भाजपाचे इतर 104 आमदार घेणार का, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात