वॉशिंग्टन डीसी मधील केनेडी सेंटर मध्ये दिलेल्या वक्तव्यावर वीर दासने दिले स्पष्टीकरण

विशेष प्रतिनिधी

वॉशिंग्टन डी सी : काही दिवसांपूर्वी अभिनेता आणि कॉमेडियन वीर दास याने ‘आय ॲम फ्रॉम टू इंडियाज’ हा व्हिडीओ त्याच्या यूट्यूब चैनलवर अपलोड केला होता. अमेरिकेतील केनेडी सेंटरमध्ये त्याने केलेल्या या सादरीकरणाच्या व्हिडिओला विरोध केला जात आहे. सोशल मीडियावर त्याच्या या व्हिडिओवर नाराजी आणि संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. यावर वीर दास याने स्पष्टीकरण दिले आहे.

Vir das reacted on his controversial speech says, I am here to do my job and will continue to do so

या व्हिडिओमध्ये त्यानी असे वक्तव्य केले आहे की, मी अशा भारतातून आलो आहे जिथे दिवसा महिलांची पूजा केली जाते आणि रात्री मात्र बलात्कार होतो. त्याच्या या वक्तव्यावर प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. यावर प्रतिक्रिया देताना तो म्हणाला की, “मी माझं काम करण्यासाठी इथे आलो आहे आणि यापुढेही ते सुरू राहील.”

वीर दास यानी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक लोकांनी तक्रारीही दाखल केलेल्या आहेत. परंतु हे सर्व होत असतानाही मी काम थांबवणार नसल्याचे वीर दासने म्हंटले आहे. वीर दास पुढे म्हणाला की, “मी लोकांना हसवायचं काम करतो आणि ते जर तुम्हाला विचित्र वाटत असेल तर तुम्ही त्यावर हसू नका.” भारतामध्ये लोकांच्यात प्रेम वाढवण्यासाठी आणि त्यांना हसवण्यासाठी अधिक कॉमेडी क्लब स्थापन व्हायला पाहिजेत असेही तो म्हणाला.


आर्यन खानची बेल मंजूर झाल्यानंतर अभिनेता सोनू सुदने केलेले ट्विट होतेय व्हायरल


वीरने आपल्या वक्तव्यामध्ये देशाचे दुहेरी चारित्र्य, कोरोना महामारी, विनोदी कलाकार यांच्यावर केल्या जाणाऱ्या कारवाया, बलात्काराच्या घटना आणि शेतकरी निषेध या मुद्द्यांचा उल्लेख केला आहे. तो म्हणाला की, “मी अशा भारतामधून आलो आहे तिथे गुणवत्ता निर्देशांक ९००० असूनपण आम्ही छतावर झोपून तारे मोजतो. आम्हाला शाकाहारी असल्याचा अभिमान आहे परंतु आम्ही भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्यांवर हल्ला करतो.” या वक्तव्यावर जोरदार टीका करीत लोकांनी त्याला देशद्रोही म्हटले आहे.

Vir das reacted on his controversial speech says, I am here to do my job and will continue to do so

 

महत्त्वाच्या बातम्या