विशेष प्रतिनिधी
मुबंई : बॉलीवूडची क्वीन म्हणून ओळखली जाणारी कंगना राणावत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणासाठी चर्चेत असते. नेपोटिझमचा मुद्दा तिने नेहमीच उचलून धरला आहे. एव्हाना भारतीय नागरिकांना नेपोटिझम शब्द तिच्यामुळेच कळलेला असावा. करण जोहरला ती नेपोटिझमचा बादशहा म्हणून संबोधते. करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये तिने करणला नेपोटिझमचा बादशहा म्हटले होते त्यांनंतर हा मुद्दा पुन्हा चर्चेचा विषय बनला होता.
Sonakshi sinha says star kids don’t go crying about loosing films
सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतरसुद्धा नेपोटिझमचा मुद्दा मिडीयामध्ये चर्चेचा विषय ठरला होता. पण या सर्व गोष्टींवर प्रथमच अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने आपले मत व्यक्त केले आहे. पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने म्हटले आहे की, आम्ही स्टारकिडस आहे म्हणून आम्हाला सगळ्याच गोष्टी सहज मिळतात असं नाहीये. आमच्याकडूनही बऱ्याच फिल्म्स काढून घेतल्या जातात. फक्त फरक हा आहे की आम्ही त्या गोष्टींसाठी मीडियासमोर रडत नाही. माझी गोष्ट जरी गृहीत नाही घेतली तरी माझ्या वडिलांना देखील या सर्व गोष्टींचा सामना करावा लागला होता. असे तिने आपले बोल्ड मत व्यक्त केले आहे.
Hum Hindustani : स्वातंत्र्यगीत झाले रिलीज, अमिताभ बच्चनपासून सोनाक्षी सिन्हापर्यंत ‘हे’ दिग्गज झाले सामील
सोनाक्षी सिन्हा ही शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. तिने दबंग या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केले होते. अकिरा, खानदानी शफाखाना अशा बऱ्याच उत्कृष्ट हिंदी सिनेमांमध्ये तिने स्त्री केंद्री भूमिका साकारल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App