विशेष प्रतिनिधी
मुंबई : जवळपास सहा महिन्यानंतर महाराष्ट्रातील नाट्यगृहे पुन्हा सुरू झाली आहेत. डोंबिवलीच्या सावित्रीबाई फुले नाट्यगृहात प्रशांत दामले यांच्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. सहा महिन्या नंतर हा पहिलाच प्रयोग हाऊसफुल झाल्याचे दिसून आले. या प्रयोगासाठी कल्याण डोंबिवलीसह मुंबई ठाणे अंबरनाथ बदलापूर आदी परिसरातील नाट्यप्रेमी सहकुटुंब दाखल झाले होते.
Six months later, the theater audience was overwhelmed!
कोरोना मुळे नाटक क्षेत्र बंद असल्याने अनेक कलाकार दिग्दर्शक लेखक यांनी आपला मोर्चा सीरियल कडे वळवला आहे. त्यामुळे नाट्यक्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्याबद्दल आता बोलण्यात काही अर्थ नाही. मात्र नाट्यकर्मींनी शासनाकडे आर्थिक मदतीची मागणी याआधी कधीही केलेली नव्हती. पण राज्य शासनाने टप्प्याटप्प्याने सोयीसुविधा वाढवून द्याव्यात. तसेच नाट्यगृहांच्या भाडय़ात सूट देण्याची अपेक्षा प्रशांत दामले यांनी यावेळी व्यक्त केली आहे. ही सूट दिल्यास 2023 पर्यंत नाट्यक्षेत्र पूर्वी होते तसे उभे राहील. असा विश्वासही प्रशांत दामले यांनी यावेळी व्यक्त केला आहे.
PRASHANT DAMLE EXCLUSIVE PART 1: अभिनय सम्राट प्रशांत दामलेंच्या सुरांनी सजला ‘द फोकस इंडिया’चा दुर्गा सन्मान पुरस्कार
सध्या सुरू असलेली मराठी नाटकं
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ 23 ऑक्टो. दु. 4.30 डोंबिवली 24 ऑक्टो. दु. 1 कोथरुड 24 ऑक्टो. सं. 5.30 बालगंधर्व 30 ऑक्टो. दु. 4 बोरिवली 31 ऑक्टो. दु. 4 दिनानाथ
‘तू म्हणशील तसं’ 23 ऑक्टो. दु. 4.30 बोरिवली 24 ऑक्टो. दु. 4.30 ठाणे (काशीनाथ घाणेकर नाट्यगृह)
अलबत्या गलबत्या, व्हॅक्यूम क्लीनर, सही रे सही, चंद्रकांत कुलकर्णींचे नवं कोरं नाटक दिवाळीच्या शुभमुहुर्तावर नाट्य रसिकांच्या भेटीला येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App