शेरणी? की सरदार उधम सिंग? ऑस्कर अवॉर्डस शर्यतीत कोण बाजी मारणार?


विशेष प्रतिनिधी

मुबंई : 22 मार्च 2022 रोजी अमेरिकेमध्ये ऑस्कर अवॉर्ड्स सोहळा संपन्न होणार आहे. त्यासाठी भारताने आपली तयारी आता चालू केली आहे. ऑस्करसाठी कोणता मूव्ही पाठवायचा यासाठी भारतातून वेगवेगळ्या लॅंग्वेजमधील 14 सिनेमे शॉर्टलिस्ट करण्यात आले आहेत. त्यापैकी एक सिनेमा म्हणजे नुकताच प्रदर्शित झालेला विकी कौशलची प्रमुख भूमिका असणारा सरदार उधम सिंग हा सिनेमा. या शर्यतीत विद्या बालनची प्रमुख भूमिका असणारा शेरणी हा सिनेमाही आहे.

sherani ? Sardar Udham Singh? Who will win the Oscar race?

फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष शाहजी करून यांनी आलेल्या सर्व एन्ट्रीमधून 14 सिनेमे सिलेक्ट केले आहेत. कलकत्ता येथे या मुव्हीजचे स्क्रीनिंग सुरू आहे. या सिनेमांमधून लवकरच एक सिनेमा ऑस्करला पाठवण्यासाठी निवडला जाईल.


सरदार उधम सिंग मुव्ही रिव्ह्यू


जालियनवाला बाग हत्याकांडास कारणीभूत असणाऱ्या संबंधित इंग्रज अधिकाऱ्याचा लंडनमध्ये जाऊन गोळी घालून हत्या करणाऱ्या सरदार उधम सिंग यांच्या जीवनावर आधारित सरदार उधम सिंग हा सुजित सरकार यांनी बनवलेला मूव्ही आहे. नुकताच हा सिनेमा अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. या सिनेमाच्या प्रदर्शनानंतर क्रिटिक्स आणि प्रेक्षक दोघांकडून अतिशय चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. सिनेमाचा लूक, डायलॉग्ज, लोकेशन्स, डिरेक्शन अतिशय उत्तम जमून आले आहे. आता हा सिनेमा ऑस्करसाठी भारताकडून ऑफिशियल एन्ट्री साठी निवडला जातो का? हे पाहणे अतिशय एक्सायटिंग असणार आहे.

या शर्यतीत विद्या बालनच्या शेरणी या सिनेमाचाही समावेश आहे. वाढते औद्योगिकीकरण आणि त्याचे निसर्गावर होणारे विपरीत परिणाम यावर आधारित शेरणी हा सिनेमा आहे. वाढती लोकसंख्या, औद्योगिक प्रगती यामुळे वृक्षतोड वाढली आहे. जंगल क्षेत्र कमी होत चालले आहे म्हणून जंगली प्राणी मानवी वसाहती मध्ये घुसले वगैरे बातम्या आपल्या कानावर पडतात. ह्यावर आधारित हा सिनेमा एक उत्कृष्ट सिनेमा आहे.

 

sherani ? Sardar Udham Singh? Who will win the Oscar race?

 

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण