विशेष प्रतिनिधी
मुंबई : शाहीद कपूरचा जर्सी हा चित्रपट 31 डिसेंबर 2021 रोजी प्रदर्शित होणार होता. पण कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे हा चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे. पण चित्रपटाच्या टीमने प्रोमोशन काही प्रमाणात केले होते. या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहिद कपूरने नेपोटिझम बद्दल आपले मत मांडले आहे.
Shahid Kapoor says about nepotism, I had auditioned a lot, I used to feel very lonely when I used to go to Bollywood parties
शाहिद म्हणतो की, मी पंकज कपूरचा मुलगा होतो. पण मी ऑडिशन्स भरपूर दिल्या होत्या. मी जेव्हा करिअरला सुरुवात केली, त्या वेळी मी कोणाचा मुलगा हे कोणालाही माहीत नव्हते. पण हे उत्तम झाले. कारण मला माझ्या चुका कळत गेल्या आणि मला दरवेळी काहीतरी वेगळे शिकायला मिळाले. आणि त्यामुळेच मला एक परिपक्व अभिनेता बनण्यास चांगली मदत झाली.
कबीर सिंगच्या यशानंतर शाहिद कपूरच्या आगामी ‘जर्सी’ चित्रपटाचा ट्रेलर झाला प्रदर्शित
पुढे तो असंही म्हणतो की, करिअरच्या सुरुवातीला जेव्हा बॉलीवूड पार्ट्यांमध्ये जायचो, तेव्हा मला अतिशय एकटे वाटायचे. कारण बॉलीवूडमध्ये जे कलाकार आहेत, ते लहानपणापासून एकमेकांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांचे बोलण्याचे विषयदेखील आम्ही याच्या घरी येतो होतो तेव्हा असे झाले, तसे झाले हे असायचे. आणि या विषयामध्ये नेहमीच काय बोलावे हे कळायचे नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App