सलमान खान मुस्लिम, डी गॅँगचा असल्याची शेजाऱ्या ची शेरेबाजी, वकीलामार्फत सलमानचा थेट न्यायालयात आरोप, म्हणाला माझी आई हिंदू, भावांनीही हिंदू मुलींशी केलेय लग्न


आपण मुस्लिम असल्यावरून शेजाºयाने शेरेबाजी केली आहे. सलमान खान म्हणजे डी गॅँगची आघाडी असल्याचे म्हटले असल्याचा आरोप प्रसिध्द अभिनेता सलमान खान याने न्यायालयात वकीलामार्फत केला आहे. आपल्या धार्मिक ओळखीवर भाष्य करणे गैर असल्याचेही सलमान खान याने म्हटले आहे. माझी आई हिंदू आणि माझे वडील मुस्लिम आहेत. माझ्या भावांनी हिंदू मुलींशी लग्न केले आहे. आम्ही सर्व सण साजरे करतो, असेही सलमानने म्हटले आहे. Salman Khan is a Muslim, neighbor’s allegation that he belongs to D gang


विशेष प्रतिनिधी

मुंबई : आपण मुस्लिम असल्यावरून शेजाऱ्याने शेरेबाजी केली आहे. सलमान खान म्हणजे डी गॅँगची आघाडी असल्याचे म्हटले असल्याचा आरोप प्रसिध्द अभिनेता सलमान खान याने न्यायालयात वकीलामार्फत केला आहे. आपल्या धार्मिक ओळखीवर भाष्य करणे गैर असल्याचेही सलमान खान याने म्हटले आहे. माझी आई हिंदू आणि माझे वडील मुस्लिम आहेत. माझ्या भावांनी हिंदू मुलींशी लग्न केले आहे. आम्ही सर्व सण साजरे करतो, असेही सलमानने म्हटले आहे.

सलमान खानचे रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे फार्महाऊस आहे. मुंबईचे रहिवासी असलेले केतन कक्कड हे सलमानच्या फार्महाऊस शेजारी असलेल्या एका टेकडीवरील प्लॉटचे मालक आहेत. सलमानच्या दाव्यानुसार, केतनने एका युट्युबरशी बोलताना त्याच्याविरुध्द अपमानास्पद टिप्पणी केली.सलमान खानने यूट्यूब, फेसबुक, ट्विटर आणि सर्च इंजिन दिग्गज गुगल सारख्या सोशल मीडिया साइट्सलाही पक्षकार बनवले आहेत. आपली बदनानी करणाऱ्या पोस्ट आणि व्हिडीओ काढून टाकण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे. केतनला अभिनेता किंवा त्याच्या फार्महाऊसबद्दल बदनामीकारक मजकूर पोस्ट किंवा प्रकाशित करण्यापासून रोखणारा कायमचा आदेश द्यावा असेही म्हटले आहे.



या प्रकरणात सुरू असलेल्या सुनावणीत सलमानने आपल्या वकीलामार्फत केतन कक्करवर धक्कादायक आरोप केले आहेत. लाइव्ह लॉमधील वृत्तानुसार, सलमानचे वकील प्रदीप गांधी यांनी गुरुवारी न्यायालयासमोर केतन कक्कडच्या पोस्ट आणि मुलाखतींचे काही भाग वाचून दाखवले. यामध्ये केतनने सलमानवर ‘डी गँगची आघाडी’ असल्याचा आरोप केला होता. त्याच्या धार्मिक ओळखीवरही भाष्य केले आहे. सलमान केंद्र आणि राज्य स्तरावर सत्ताधारी पक्षाशी जोडलेला होता, असे सूचित केले होते. सलमानने मुलांची तस्करी केली तसेच त्याच्या फार्महाऊसमध्ये सिनेतारकांचे दफन करण्यात आले आहे, असेही कक्कड यांनी म्हटले आहे.

सलमानने आपल्या वकिलामार्फत उत्तर देताना म्हटले की, पुराव्याशिवाय हे सर्व आरोप करणे हे कक्कड यांचा कल्पनाविलास आहे. मालमत्तेच्या वादात माझी प्रतिमा डागाळत आहे. माझी आई हिंदू आणि माझे वडील मुस्लिम आहेत. माझ्या भावांनी हिंदू मुलींशी लग्न केले आहे. आम्ही सर्व सण साजरे करतो, असेही सलमानने म्हटले आहे.

कक्कड हे एक सुशिक्षित व्यक्ती आहेत. अशा प्रकारचे गुंडाछाप आरोप करणे योग्य नाही. सोशल मीडियावर लोकांना एकत्र करणे, तुमचा राग बाहेर काढणे ही आजकाल सर्वात सोपी गोष्ट आहे. माझी या राजकारणात पडण्याची इच्छा नाही, असेही सलमानने म्हटले आहे.

Salman Khan is a Muslim, neighbor’s allegation that he belongs to D gang

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात