आरआरआर बॉक्स ऑफिस प्री रिलीझ धमाका : ‘आरआरआर’ ची रिलीजपूर्वी 900 कोटींची कमाई ; भारतीय सिनेमाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रक्कम

RRRच्या हक्कांसाठी निर्मात्यांमध्ये स्पर्धा; प्रदर्शनाआधिच चित्रपटानं कमावले कोट्यवधी


बॉलिवूडच्या अजयचा तिथं देखील जलवा पाहायला मिळत आहे.


दक्षिण इंडस्ट्रीचे प्रसिद्ध दिग्दर्शक एस.एस. राजामौली सध्या आपल्या आगामी ‘आरआरआर’ (RRR film) चित्रपटामुळे प्रचंड चर्चेत आहेत. हा चित्रपट यावर्षी 13 ऑक्टोबरला चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.


एसएस राजामौली यांनी ‘आरआरआर’चे नॉर्थ इंडियन थिएट्रिकल राईट्स पेन स्टुडिओला विकल्याचे समोर आले आहे RRR box office pre-release blast: Rs 900 crore before the release of ‘RRR’; This is the largest amount in the history of Indian cinema


विशेष प्रतिनिधी

मुंबई : दक्षिण चित्रपट अभिनेता राम चरण, जूनियर एनटीआर, अजय देवगण आणि आलिया भट्ट स्टारर दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांचा चित्रपट आरआरआर (आरआरआर) सिनेमा म्हणजे सिल्व्हर स्क्रिन वर तूफान येणार. या सिनेमाने रिलीज होण्यापूर्वीच त्याच्या खात्यात 900 कोटी रुपये जमा केले आहेत. भारतीय सिनेमाच्या इतिहासातील ही सर्वात मोठी रक्कम आहे.

अजय देवगण (Ajay Devgan) बॉलिवूडमधील एक सुपरस्टार अभिनेता म्हणून ओळखला जातो. गेल्या काही काळात त्याचा प्रत्येक चित्रपट कोट्यवधींची कमाई करतो. येत्या काळात आर.आर.आर. (RRR) या दाक्षिणात्य चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाद्वारे अजय तमिळ सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. मात्र बॉलिवूडच्या या हिरोचा तिथं देखील जलवा पाहायला मिळत आहे. अजयच्या RRR या चित्रपटानं प्रदर्शनाआधिच कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.RRR या चित्रपटाचं दिग्दर्शन एस.एस. राजामौली (SS Rajamouli) यांनी केलं आहे. यापूर्वी त्यांनी बाहुबली या सुपरहिट चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या पार्श्वभूमीर RRR देखील तिकिटबारीवर धुमाकूळ घालणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र यामुळंच या आगामी चित्रपटाच्या टीव्ही आणि डिजीटल हक्कांसाठी निर्मात्यांमध्ये स्पर्धा सुरु होती. अखेर या स्पर्धेत जयंतीलाल गाडा विजयी ठरले. त्यांनी 210 कोटी रुपयांमध्ये सर्व हक्क खरेदी केले. शिवाय चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी त्यांनी निर्मात्यांसोबत 50 टक्क्यांचा करार केला आहे.

एस. एस राजामौलीच्या ‘आरआरआर’ चित्रपटामध्ये एनटीआर, रामचरण, अजय देवगण, आलिया भट्ट यांच्यासारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट तेलुगू, हिंदी, तमिळ, मल्याळम आणि कन्नडसह इतर अनेक भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. परदेशातील फिल्म डिस्ट्रीब्युशन हाऊस ‘फार्स फिल्म्स’ सोबत राजामौलींनी मोठी डील केली आहे.

RRR box office pre-release blast: Rs 900 crore before the release of ‘RRR’; This is the largest amount in the history of Indian cinema

    Leave Your Comment

    Your email address will not be published.*