‘जय भीम’ या जस्टिस चंद्रू यांच्या मानवी हक्कासाठी दिलेल्या लढाईवर आधारित सिनेमाची सत्यकथा


विशेष प्रतिनिधी

मुंबई: ॲमेझॉन प्राईम व्हिडिओचा नवा सिनेमा जय भीम याला प्रेक्षक व टीकाकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सूर्या प्रमुख भूमिकेत आहे. प्रकाशराज, रजिषा विजयन आणि लिजोमोल जोस हे सहाय्यक भूमिकेत आहेत.

Real story of movie Jai Bhim which is based on Justice Chandru’s fight for human rights

ज्येष्ठ वकील चंद्रू ज्यांनी मुख्यतः मानवी हक्क संबंधातील दावे हाताळले आहेत आणि त्यासाठी फी पण आकरलेली नाही. त्यांच्या वास्तविक जीवनातील दाव्यावर आधारित हा सिनेमा आहे. १९९५ मध्ये आदिवासींना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी ही केस लढली होती. या केसमध्ये इरुलर समाजातील महिलेच्या संदर्भातील दाव्यावर हा सिनेमा आधारित आहे. सकृत दर्शनी तिच्या नवऱ्याचा पोलीस कस्टडीमधे मृत्यू झाला होता. या सिनेमात कस्टडीमधे होणारे अत्याचार व आदिवासी समाजाला भोगावा लागणारा जातीवादाचा त्रास यावर हा चित्रपट भाष्य करतो.


तांडवमधील आक्षेपार्ह दृश्ये, अॅमाेन प्राईमकडून बिनशर्त माफी


चंद्रू हे कार्यकर्ते व वकील असून ते मद्रास हायकोर्टमध्ये न्यायाधीश झाले. न्यायाधीश म्हणून त्यांनी जवळजवळ ९६००० दावे निकाली काढले. त्यामध्ये मानवी हाक्काबद्दलचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय सामील आहेत. तसेच त्यांचा एक महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजे सर्वसामान्य दफनभूमीचा वापर सर्व समुदायांना करता येणेबाबतचा आहे.

ते वकील असताना मानवी हक्काबद्दलच्या कोणत्याही दाव्यासाठी फी आकारत करत नसत. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत खेड्यापाड्यातून आलेल्या महिला तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत व उपेक्षित समुदायातील महिला यांच्यासाठी केसेस लढल्या आहेत. २००६ साली हायकोर्टाचे ॲडिशनल जज म्हणून त्यांची नेमणूक झाली. ९ नोव्हेंबर २००९ ला परमनंट जज म्हणून निवड झाली. ते मार्च २०१३ मध्ये न्यायाधीश म्हणून निवृत्त झाले. ते न्यायक्षेत्रातील सुधारणावादी असून या सिनेमात त्यांच्या प्रसिद्ध केसेसबद्दल पण माहिती मिळणार आहे.

Real story of movie Jai Bhim which is based on Justice Chandru’s fight for human rights

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात