विशेष प्रतिनिधी
मुंबई : सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे कंगना नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी कंगनाला कोरोनाची लागण झाली होती. तर कालच तिचा कोरोना चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला असून आपण कोरोनामुक्त झाल्याची माहिती कंगनाने दिली आहे.तीला कोव्हिड रिपोर्ट मागनार्यांना देखील तीने जबरदस्त उत्तर दिले आहे . रामभक्त कधीच खोटे बोलत नाही … जय श्री राम. Rambhakta never lies … Jai Shri Ram!
तर आता कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हीडिओ शेअर करत कोरोनावर कशा रितीने मात केली हे सांगितलं आहे.
इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हीडिओमध्ये कंगना म्हणते, “मी कोणी तज्ज्ञ नाही, परंतु कोरोनाशी लढा दिलेला मी माझा अनुभव शेअर करतेय. आशा आहे की यामुळे मदत होईल. कोरोनावर मात करण्याच्या माझ्या प्रवासापासून लोक शिकू शकतात. म्हणून मी फक्त त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा व्हिडिओ तयार पोस्ट करतेय.”
View this post on Instagram A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)
A post shared by Kangana Ranaut (@kanganaranaut)
कंगना पुढे म्हणते, तुम्ही या प्रॉब्लेमला तीन गटात विभागलं पाहिजे. शारीरिक, मानसिक आणि भावनिक. शिवाय काढा प्या, प्राणायाम करा तसंच योग करा. जी योगासन तुम्हाला माहिती आहे ती करा. मीही तेच केलं. मी मानसिक स्वास्थासाठी मंत्रांचा जप केला. मी हनुमान चालीसा आणि गायत्री मंत्र खूप ऐकले. यामुळे माझ्या मनात शांतता मिळाली. आणि यानंतर मी ७-८ दिवसांत कोरोनाला हरवलं.
तर कोरोनावर मात केल्यानंतर कंगनाने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर केली होती. या स्टोरीमध्ये तिने, “मला खूप काही सांगायची इच्छा आहे की मी कोरोनाला कसं हरवलं पण, मला सांगण्यात आलं आहे की कोरोनाच्या चाहत्यांना नाराज करू नको.”असं म्हटलं होतं.
८ तारखेला कंगनाने सोशल मीडियावर पोस्ट करत कोरोना पॉझिटीव्ह असल्याचं सांगितलं होतं. या पोस्टमध्ये कंगनाने जर तुम्ही घाबरला तर तो तुम्हाला घाबरवेल. चला या कोरोनाला संपवू. हा कोरोना काहीच नाही, केवळ एक साधा ताप आहे, असं लिहिलं होतं. मात्र कंगनाच्या या पोस्टनंतर इन्स्टाग्रामने तिची ही पोस्ट डिलीट केली. यावर कंगनाने नाराजीही व्यक्त केली होती.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App