विशेष प्रतिनिधी
मुंबई : राखी सावंत हे एका वादळाचं नाव आहे असं म्हणायला हरकत नाही. नेहमीच कोणत्या ना कोणत्या विचित्र कारणांसाठी ती चर्चेत असते. आता नुकताच तिला बिग बॉस 15 च्या सीजनमध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री मिळाली होती. राखी सावंतने दोन वर्षांपूर्वी लग्न केले होते.(राखीच्या म्हणण्यानुसार) तर बिग बॉस मध्ये तिच्या नवऱ्याला प्रथमच पाहायची संधी तिच्या चाहत्यांना मिळाली हाेती. रितेश सिंग असे तिच्या नवऱ्याचे नाव आहे आणि तो परदेशामध्ये बिझनेस करतो, असे राखीने सांगितले होते.
Rakhi Sawant’s ‘fake’ / ‘real’ husband’s real face revealed, first wife accused of beating
राखीने दोन वर्षांपूर्वी लग्न केले होते. पण आपल्या नवऱ्या सोबतचा कोणताही फोटो तिने शेअर केला नव्हता. त्यामुळे राखीचं लग्न हा देखील एक पब्लिसिटी स्टंट आहे, असे बऱ्याच लोकांना वाटत होते. तर या सर्व गोष्टींवर अभिजीत बुचुकलेने याने देखील कमेंट केली होती. राखीचा हा नवरा रितेश, ह्याला भाड्याने आणलेले आहे असे विधान अभिजित बुचुकले याने केले होते.
बऱ्याच लोकांनी अशी देखील टीका केली होती की, रितेश हा एक असिस्टंट कॅमेरामन आहे. ह्या कॅमेरामॅनलाच चांगले कपडे देऊन राखीचा पती म्हणून बिग बॉसमध्ये दाखवले जात आहे. आणि हा सर्व एक पब्लिसिटीसाठी केलेला प्रकार आहे.
चढ्ढा माझे नाव घेतले तर तुमचा चढ्ढा उतरवेल, राखी सावंतचा आपचे नेते राघव चढ्ढा यांना इशारा
तर आता रितेशचे बिंग मात्र फुटलेले आहे. रितेशच्या पहिल्या पत्नीने समोर येतं त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. तो एकेकाळी तिला पट्ट्याने मारायचा, त्या दोघांना मुले देखील आहेत.
तर या सर्व प्रकरणानंतर रितेशने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर या सर्व गोष्टींबद्दल क्षमा मागितली आहे. आणि बिग बॉसला या प्रकरणामध्ये लक्ष घालण्याचे सांगितले आहे. आपल्याला आपले भविष्य आणि करिअर मार्गाला लावायचे होते. मला बरेच पैसे देखील यातून मिळणार होते, म्हणून मी हे कृत्य केले. आणि आपण केलेल्या कृत्याची मला लाज वाटते. असे देखील त्याने म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App