विशेष प्रतिनिधी
मुंबई : बोल्ड आणि बिनधास्त अशी ओळख असलेली अभिनेत्री पूनम पांडेच्या नवऱ्याला म्हणजेच सॅम बॉम्बेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. पूनम पांडेने तिचा नवरा सॅम बॉम्बे विरोधात मारहाण केल्याची तक्रार दाखल केली होती. ज्यानंतर मुंबई पोलिसांनी ही कारवाई केली आहे. ANI ने दिलेल्या वृत्तानुसार पूनम पांडेच्या डोक्याला, चेहऱ्याला आणि डोळ्याला गंभीर इजा झाली आहे त्यामुळे तिला रूग्णालयात दाखल कऱण्यात आलं आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत. Poonam Pandey beaten by her husband Sam Bombay, arrested by Mumbai police; Poonam Pandey at the hospital
Maharashtra | Actress Poonam Pandey's husband Sam Bombay was arrested yesterday in Mumbai after the actress complained that he assaulted her. Poonam Pandey was admitted to a hospital: Mumbai Police — ANI (@ANI) November 8, 2021
Maharashtra | Actress Poonam Pandey's husband Sam Bombay was arrested yesterday in Mumbai after the actress complained that he assaulted her. Poonam Pandey was admitted to a hospital: Mumbai Police
— ANI (@ANI) November 8, 2021
पूनम पांडेला पहिल्यांदा सॅम बॉम्बेकडून मारहाण झाली आहे असं नाही. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात या दोघांचं लग्न झालं त्यानंतर काही दिवसातच पूनम पांडेने सॅम बॉम्बेवर शोषणाचे आरोप केले होते. त्यावेळी गोव्यात सॅम बॉम्बेला अटक झाली होती. सॅम बॉम्बेला त्यानंतर सशर्त जामीन मिळाला होता.
पूनम पांडेने सॅम बॉम्बे हे प्रकार करत असल्याने घटस्फोट घेण्याचा विचारही करत होती. मात्र नंतर सॅम आणि पूनम यांच्यात समझोता झाला. पूनम पांडे वारंवार ज्या तक्रारी करते आहे त्यावरून या दोघांच्या नात्यात दरी निर्माण झाली आहे हे दिसतं आहे. सॅम बॉम्बे हा एक प्रोड्युसर आहे.
अभिनेत्री पूनम पांडेने नशा या सिनेमाद्वारे तिचं करिअर सुरु केलं होतं. मात्र हॉट व्हिडीओ पोस्ट करण्यात ती अग्रेसर आहे. तिला इन्स्टावर फॉलो करणारा खास असा तिचा फॅन फॉलोईंग आहे. पूनम पांडे आणि सॅम बॉम्बे यांनी गेल्या वर्षी जुलै महिन्यात साखरपुडा केला होता तर सप्टेंबर महिन्यात लग्न केलं होतं. पूनम आणि सॅमचे सप्टेंबर 2020 मध्ये लग्न झाले. लग्नानंतर काही दिवसांनी पूनमने सॅमवर लैंगिक छळ, धमक्या आणि मारहाणीचे आरोप केले. तिने गोव्यात तक्रार दाखल केली होती आणि सॅमने कथितपणे तिच्यावर हल्ला केला आणि धमकी दिल्याचे म्हटले होते. पूनम त्यावेळी गोव्यात शूटिंग करत होती. तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला अटक केली पण दुसऱ्याच दिवशी त्याला जामीन मिळाला होता. त्यावेळी पूनम मला वेगळे व्हायचे आहे असे म्हणाली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App