कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

विशेष प्रतिनिधी

बंगलोर : सुप्रसिद्ध कन्नड चित्रपट अभिनेते पुनीत राजकुमार यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. ते 46 वर्षांचे होते. बंगलोरमधील विक्रम हॉस्पिटलमध्ये ते काही काळापासून अॅडमिट होते.

Kannada film actor Puneet Rajkumar dies of heart attack

कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये त्यांना अपु या नावाने ओळखले जायचे. ते एक उत्तम अभिनेता, एक सिंगर, टेलिव्हिजन रिप्रेझेंटेटीव्ह आणि निर्माते म्हणून काम करायचे. त्यांनी आजवर 29 पेक्षा जास्त सिनेमांमध्ये काम केले आहे. काल रात्री 11.30 वाजता छातीमध्ये दुखू लागल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आले होते. डॉक्टरांची एक टीम सतत त्यांना मॉनिटर करत होते. विक्रम हॉस्पिटल मधील डॉ. रंगनाथ नायक यांनी त्यांची परिस्थिती चिंताजनक होती असे सांगितले होते.


National Film Award 2021 : ‘ छिछोरे ‘ ला मिळाला सर्वश्रेष्ठ हिंदी फिल्म पुरस्कार , साजिद नाडियाडवाला आणि नितेश तिवारी ने सुशांत सिंहला केला समर्पित


वसंता गीता, भगवंता, चालीसुवा मोडागाळू, इरेडू नक्षत्रगालू, बेटाडा होऊ हे त्यांचे काही गाजलेले सिनेमे आहेत. यापैकी बेटाडा होऊ(1985) या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार या कॅटेगरी मधील राष्ट्रीय पारितोषिक मिळाले होते.

त्यांच्या मृत्यूच्या बातमीने अभिनेता सोनू सूद यांनी ट्विटकरून आपले दु:ख व्यक्त केले आहे. आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या मृत्यूच्या बातमीने त्यांच्या फॅन्सना प्रचंड धक्का बसला आहे.

Kannada film actor Puneet Rajkumar dies of heart attack

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात