विशेष प्रतिनिधी
मुबंई : ‘जय मल्हार’ या मालिकेतून महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेला अभिनेता देवदत्त नागे याचा तिसरा हिंदी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. याआधी त्याने ‘तानाजी’ आणि ‘सत्य मेव जयते’ या हिंदी चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली होती. तानाजी या सिनेमामध्ये तानाजी मालुसरे यांचा मोठा बंधू सूर्याजी मालुसरे यांची भूमिका त्याने साकारली होती. नुकताच दिग्दर्शक ओम राऊत यांनी आधी पुरुष या चित्रपटाचे शूटिंग संपल्याचे आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर करत जाहीर केले आहे. ओम राऊत यांनीच तानाजी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
Jai Malhar fame actor Devdutt Nagy to star in Bahubali Prabha’s movie ‘Adipurush’
‘आदीपुरुष’ या सिनेमामध्ये बाहुबली फेम अभिनेता प्रभास तर मिमी फेम अभिनेत्री क्रिती सेनोन प्रमुख भूमिकेमध्ये झळकणार आहेत. तसेच अभिनेता सैफ अली खानदेखील या सिनेमामध्ये दिसून येणार आहे. आदिपुरुष हा एक पीरियड ड्रामा आहे. जवळजवळ 103 दिवसांच्या शूटिंग नंतर हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमातून मराठी कलाकार तृप्ती तोडरमल आणि अभिनय बेर्डे देखील हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार असल्याचे समजते.
‘राधे श्याम’ च्या सेटवर प्रभास आणि पूजा हेगडे यांच्यात झाले भांडण? निर्मात्याने सांगितले संपूर्ण सत्य
देवदत्त नागे सध्या ‘डॉक्टर डॉन’ या मराठी मालिकेमध्ये काम करताना दिसून येत आहेत. देवदत्त नागे याने साकारलेली जय मल्हार या मालिकेतील भूमिका प्रचंड गाजली होती. या भूमिकेने त्याला अभिनय क्षेत्रामध्ये एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत केली होती. आपल्या करिअरचा ग्राफ उंचावत आता देवदत्त तिसऱ्या हिंदी चित्रपटामध्ये काम करताना दिसून येणार आहे. आणि त्याचे चाहते हा सिनेमा पाहण्यासाठी नक्कीच उत्सुक असतील यात काही शंकाच नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App