विशेष प्रतिनिधी
मुबंई : इरफान खान, नवाजुद्दीन सिद्दीकी, निम्रत कौर यांची प्रमुख भूमिका असणारा सिनेमा ‘द लंच बॉक्स”‘ ला रिलीज होऊन आज बरोबर आठ वर्ष झाली आहेत. रितेश बत्रा यांच्या या सिनेमाला प्रेक्षकांकडून आणि समीक्षकांकडून कौतुक मिळवण्यामध्ये यश मिळाले होते.
Irfan khan starrer the lunchbox has completed 8 years of release, nawazuddin siddiqui shares some memories
या सिनेमाच्या शूटिंग वेळचे अनुभव शेअर करताना अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी म्हणतो की, या सिनेमाच्या शूटिंगमधली सर्वात आवडता भाग म्हणजे लोकल ट्रेनमध्ये केलेले शुटींग. आम्ही आख्ख कम्पार्टमेंट शूटिंगसाठी बुक करून ठेवले होते. लोकांची प्रचंड गर्दी असलेल्या ट्रेनमध्ये आम्हाला शुटींग करायचे होते. लोक नेहमीप्रमाणे ट्रेनमधून ये जा करत होते आणि नेमक त्यावेळी आम्हाला तो सीन शूट करायचा होता. आणि अगदी सहज तो सीन शूट केला गेला होता. ही एक खूप वेगळीच अनुभूती होती.’
‘पावनखिंड’चा थरार लवकरच रसिकांना चित्रपटगृहात पाहायला मिळणार
२०१३ ला जेव्हा हा सिनेमा प्रदर्शित झाला होता तेव्हा नवाजुद्दीन सिद्दीकी आणि इरफान खान या दोघांमध्ये काही वाद असल्याच्या अफवा पसरल्या होता. या सर्व अफवांना पूर्णविराम देत नवाजुद्दीन सिद्दिकी यांनी म्हटले आहे की, अशी कोणतीही गोष्ट झालेली नव्हती. इरफानसोबत काम करण्याची संधी मिळाली होती यामुळेच मी खूप सुखावून गेलो होतो.
एकमेकांना कधीही न पाहिलेल्या दोन लोकांची प्रेमकहाणी एका लंच बॉक्स पासून सुरू होते यावर आधारित हा सिनेमा होता. इरफान खानच्या करिअरमधील हा एक वन ऑफ दी बेस्ट सिनेमा होता असे म्हणायला अजिबात हरकत नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App