वृत्तसंस्था
नवी दिल्ली : प्रख्यात पंजाबी आणि हिंदी चित्रपटातील अभिनेते सतीश कौल (वय 74) यांचे कोरोनामुळे लुधियाना येथे निधन झाले. दूरदर्शन मालिका विक्रम वेताळ आणि महाभारतमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका गाजल्या. महाभारतमध्ये त्यांनी इंद्रदेवाची केलेली भूमिका गाजली होती. Indradev in the Mahabharata series Actor Satish Kaul dies due to corona
त्यांची बहीण सत्यादेवी म्हणाल्या, गेल्या पाच सहा दिवसांपासून त्यांना ताप येत होता. प्रकृती चांगली नसल्याने त्यांना श्रीराम चॅरिटेबल रुग्णालयात दाखल केले होते. तेथे त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली. उद्या त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
सतीश कौल आणि त्यांची बहीण सत्या एवढेच त्यांचे कुटुंब होते. गेल्या वर्षी लॉकडाऊन लागल्यानंतर त्यांनी मदतीची याचना केली होती. औषधे, किराणा माल आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठा करावा, अशी विनंती त्यांनी बॉलीवूडला केली होती. कौल यांनी पंजाबमध्ये 2011 मध्ये अभिनय प्रशिक्षण केंद्र सुरू केले. पण ते चालले नाही. 2015 मध्ये त्यांचा खूबा मोडल्याने ते बेडवर पडून होते.
दरम्यान , कौल यांनी पंजाबी, हिंदीत 300 चित्रपटात काम केले. हिंदीत राम लखन, प्यार तो होना ही था! आणि पंजाबीमध्ये आँटी नंबर 1 हे त्यांचे चित्रपट गाजले. विक्रम वेताळ आणि महाभारत मालिकेत ते चमकले. महाभारतमध्ये त्यांची इंद्रदेवाची भूमिका गाजली होती.
हे ही वाचा
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App