IPL 2021 : CSK vs DC आज भिडणार ‘शिष्य शिष्य-गुरूवे गुरूवे’…


  • आज आयपीएलचा दुसरा सामना चेन्नई सुपर किंग्स (chennai super kings) विरुद्ध दिल्ली कॅपिट्ल्स (delhi capitals) यांच्यात रंगणार आहे. 

  • हे दोन्ही संघ एकूण 23 वेळा आमनेसामने भिडले आहेत. यामध्ये धोनीची अनुभवी चेन्नई वरचढ राहिलेली आहे. चेन्नईने 15 सामन्यात दिल्लीवर विजय मिळवला आहे.

विशेष प्रतिनिधी 

मुंबई : आयपीएलचा  दुसरा सामना आज खेळवण्यात येणार आहे.  चेन्नई सुपर किंग्जस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज लढत होणार असूूून यात महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आणि ऋषभ पंत (Rishabh Pant) ही गुरु शिष्याची जोडी आमनेसामने असणार आहे.अनुभवी धोनीच्या विरुद्ध पंत कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष असेल.who will win chennai super kings vs delhi capitals

 

 

एकाबाजूला चेन्नईच्या नेतृत्वाची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर आहे. तर दिल्लीच्या कर्णधारपदाची धुरा युवा रिषभकडे असणार आहे. त्यामुळे या सामन्यात गुरु शिष्य यांच्यात कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सुरु होणार आहे.

भारतीय क्रिकेटमधील ही जोडी बरीच फेमस देखील आहे. मुंबईत होणाऱ्या या सामन्यात भारतीय संघाचे कोच रवी शास्त्री यांनी मजेशीर ट्विट केलं आहे.

रवी शास्त्री यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेय की, ‘गुरू विरुद्ध शिष्य! आज सामना पाहायला मजा येईल. आवश्य स्टंप माइक ऐका. #DhoniReturns #Pant #IPL2021 #DCvsCSK – @ChennaiIPL @DelhiCapitals’ धोनी आणि पंत स्टंपच्या मागे मजेदार कॉमेंट्स करण्यात प्रसिद्ध आहेत. याबाबतचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेले आहेत. चाहत्यांना त्यांच्या कॉमेंट्स आवडतात.

पंत आणि धोनी हे दोन्ही संघांचे कर्णधार आहेत. हे दोघे आपल्या संघाकडून नेतृत्व, फलंदाजी आणि विकेटकीपिंग अशा तिन्ही आघाड्यांवर योगदान देतात. त्यामुळे या सामन्यात या तिन्ही आघाड्यांवर कोण यशस्वी ठरणार, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे.

who will win chennai super kings vs delhi capitals


 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*