सुभाषबाबू सर्व भारताचे नेते होते, तुमच्या एकट्याचे नव्हते; ममतांचा भाजपवर निशाणा


वृत्तसंस्था

हुगळी (पश्चिम बंगाल) : नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या १२५ जयंती कार्यक्रमाचे राजकीय लळिताचे कीर्तन अजून सुरूच आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिक्टोरिया मेमोरिअलच्या कार्यक्रमाला एकत्र आले पण केवळ प्रोटोकॉलसाठी. त्यातही ममता आणि मोदींनी एकमेकांपासून जास्तच अंतर राखले होते… त्याचेच पडसाद आज हुगळीतील ममतांच्या रॅलीत उमटले. Netaji Subhash Chandra Bose is everyone’s leader West Bengal CM Mamata Banerjee

ममतांनी २३ जानेवारीच्या कार्यक्रमावरून हुगळीच्या रॅलीत बरेच खरे – खोटे सुनावले. ते (भाजपवाले) माझी पंतप्रधानांसमोर परीक्षा घेत होते. त्यांनी मुद्दाम नारेबाजी केली. पण तो सुभाषबाबूंसारख्या महान नेत्याच्या जयंती कार्यक्रमात औचित्यभंग होता. ते आज सुभाषबाबूंचे नाव घेत आहेत. पण ते काही तुमच्या एकट्याचे नेते नव्हते.सुभाषबाबू सगळ्या भारताचे नेते होते. पण त्यांनी येथे येऊन नारेबाजी करून सुभाषबाबूंचा अपमान केला. आधी त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागरांचा पुतळा फोडला होता. नंतर त्यांनी विश्व भारती विद्यापीठात येऊन रवींद्रनाथ टागोरांचा अपमान केला. सुभाषबाबूंच्या कार्यक्रमात नारेबाजी करून अपमान केला. त्यांनी बंगालचा आणि बंगाली जनतेचा अपमान केला, असे टीकास्त्र ममतांनी सोडले.

आता ते आम्हाला बंदूका दाखवताहेत. पण आम्ही बंदुकांवर नाही, तर राजकारणावर विश्वास ठेवतो. आम्ही लोकांच्या पाठिंब्यावर राजकारण करून त्यांचा पराभव करू, असा दावा ममतांनी केला.

Netaji Subhash Chandra Bose is everyone’s leader West Bengal CM Mamata Banerjee

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती