टायटॅनिक स्टार लिओनार्डो डिकॅप्रियोचे Must Watch पाच सिनेमे

द गॉडफादर मधील अल पसिनो नंतर जगातील आजवरचा सर्वोत्तम अभिनेता कोण? ह्या प्रश्नाला उत्तर एकच टायटॅनिक सिनेमातला लिओनार्डो डिकॅप्रियो. काही काही कलाकारांकडे बघून असंच वाटतं की, त्यांचा जन्म फक्त अभिनय करण्यासाठीच झाला असावा. लिओनार्डो डिकॅप्रियो त्यापैकीच एक आहे. चला तर पाहूया लियोनार्डो डिकॅप्रियोचे पाच सिनेमे जे तुम्ही पाहिलेच पाहिजेत.

Five must-see movies by Titanic star Leonardo DiCaprio

1. इन्सेप्शन : इनसेप्शन हा 2010 साली प्रदर्शित झालेला सायन्स फिक्शनवर आधारीत सिनेमा आहे. क्रिस्टोफर नोलन यांनी हा सिनेमा लिहिला होता. त्यांनीच हा मुव्ही दिग्दर्शित केला आहे. या चित्रपटात लिओनार्डो डिकॅप्रियोने एका व्यावसायिक चोराची भूमिका साकारली आहे. स्वप्न आणि सामायिकरण असा काहीशा वेगळ्या कनसेप्टवर आधारित हा मुव्ही आहे.

2. द वुल्फ ऑफ वॉल स्ट्रीट : 2013 साली प्रदर्शित झालेला हा एक बायोग्राफिकल चित्रपट आहे. मार्टिन स्कोर्से यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे आणि टेरेन्स विंटर यांनी लिहिलेला आहे. जॉर्डन बेलफोर्ट ह्या व्यक्तीच्या जीवनावर आधारित हा सिनेमा आहे.

न्यूयॉर्क शहरातील स्टॉक ब्रोकर म्हणून त्याच्या कारकिर्दीबद्दल बेलफोर्टचा दृष्टीकोन आणि त्याची फर्म, स्ट्रॅटन ओकमाँट, वॉल स्ट्रीटवर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि फसवणुकीत गुंतलेली, ज्यामुळे शेवटी त्याची पडझड कशी झाली हे सर्व जॉर्डन बेलफोर्ट यांनी 2007 मध्ये प्रकाशित केलेल्या आपल्या पुस्तकात सांगितले होते. लिओनार्डो डिकॅप्रिओ ने या सिनेमात जॉर्डन बेलफोर्ट यांचा रोल प्ले केला आहे. तोच ह्या चित्रपटाचा निर्माता देखील होता.


अभय देओल आणि लिओनार्डो डिकॅप्रियो यांच्या प्रॉडक्शन हाऊस मार्फत ‘पेप’ हा Guglielmo Papaleo यांच्या जीवनावर आधारित सिनेमा लवकरच होणार प्रदर्शित


3. वन्स अपॉन अ टाईम इन हॉलिवूड : २०१९ साली प्रदर्शित झालेला हा एक कॉमेडी-ड्रामा चित्रपट होता. क्वेंटिन टॅरँटिनो यांनी हा सिनेमा लिहिलेला होता. आणि त्यांनीच हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. लिओनार्डो डिकॅप्रियो, ब्रॅड पिट आणि मार्गोट रॉबी इत्यादी कलाकारांचा या चित्रपटात समावेश होता. 1969 मध्ये लॉस एंजेलिस मधिल हॉलीवूड आणि वेगाने होणारे बदल यावर आधारित ज सिनेमा आहे.

4. रिव्होल्युशनरी रोड : 2008 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा सॅम मेंडिस यांनी दिग्दर्शित केला होता. उभा सिनेमाची पटकथा जस्टिन हेथे यांनी लिहिली होती. रिचर्ड येट्सच्या यांची 1961 साली प्रदर्शित झालेल्या कादंबरीवर आधारित हा सिनेमा होता. लिओनार्डो डिकॅप्रियो आणि केट विन्सलेट ही सुपरहिट जोडी ह्या सिनेमात झळकली होती.

1950 च्या काळात एक जोडपे त्यांच्या वैयक्तिक समस्यांना तोंड देण्यासाठी आणि त्यांच्या वैवाहिक जीवनातील समस्यांपासून दूर जाण्यासाठी बाहेर पडतात. ह्या प्रवासावर आधारित हा सिनेमा आहे.

5. कॅच मी इफ यू कॅन : 2002 साली प्रदर्शित झालेला हा सिनेमा अमेरिकेतील गुन्हेगारी।क्षेत्रातील एक बाजू मांडणारा चित्रपट आहे. स्टीव्हन स्पीलबर्ग यांनी सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे तर लिओनार्डो डिकॅप्रियो आणि टॉम हँक्स या सिनेमात प्रमुख भूमिकेत झळकले होते.
हा चित्रपट फ्रँक अॅबॅग्नेल यांच्या आत्मचरित्रावर आधारित आहे.

Five must-see movies by Titanic star Leonardo DiCaprio

 

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात